PM-kisan
PM-kisan 
मुख्य बातम्या

‘पीएम-किसान’चा १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पीएम-किसान’ योजनेत अधिक शेतकऱ्यांचा समावेश करणार आहे. सध्या योजनेचा ९ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १२ कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.  ‘‘सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत ९ कोटी शेतकऱ्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना या योनजेचा लाभ देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ‘पीएम-किसान’ योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ८ कोटी ४६ लाख शेतकऱ्यांना ५० हजार ८५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत देशातील ९ कोटी शेतकऱ्यांना ५६ हजार कोटी रुपये वितरित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे,’’ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी केंद्र सरकारने ‘पीएम-किसान’ योजनेसाठी ७५ हजार कोटींची तरतूद केली असून, १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. पशुसंवर्धन मंत्रालयाने कृषी मंत्रालयाला पत्र लिहून देशातील दोन कोटी मच्छीमारांचा या योजनेत समावेश करण्यास सुचविले आहे. मच्छीमारांचा योजनेत समावेश केल्यानंतर पुढील वर्षी लाभार्थ्यांची सख्या वाढणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.  किसान क्रेडिट कार्ड देणार कृषी मंत्रालयाने जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांचे आधार संलग्न करण्याचे कामही हाती घेतले आहे. यातून शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विम्यासारख्या योजनांचा लाभ देण्यासाठी फायदा होईल. ‘पीएम-किसान’ योजनेचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना व्याज अनुदानावर कर्ज उपलब्ध होईल. मच्छीमारांचाही समावेश करा ः पशुसंवर्धन मंत्रालय पशुसंवर्धन मंत्रालयाने कृषी मंत्रालयाला पत्र लिहून देशातील दोन कोटी मच्छीमारांचा या योजनेत समावेश करण्यास सुचविले आहे. कृषी मंत्रालयाकडून या प्रस्तावावर विचार सुरू आहे. परंतु, मच्छीमारांचा समावेश करणे कठीण आहे. कारण, सरकारने भूमिहीन शेतकऱ्यांचाही समावेश या योजनेत केलेला नाही. मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड मिळू शकते, तर ‘पीएम-किसान’ योजनेतही त्यांचा समावेश होऊ शकतो, असे पशुसंवर्धन मंत्रालयाचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT