soybean
soybean  
मुख्य बातम्या

कृषी विद्यापीठातर्फे उन्हाळी सोयाबीनचे १०० हेक्टरवर बिजोत्पादन

टीम अॅग्रोवन

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे यंदा रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस आदी पिकांचा २५० हेक्टरवर, तर उन्हाळी सोयाबीनचा १०० हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येईल. सुमारे २ हजार २२७ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठातर्फे मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यातील संशोधन केंद्र, महाविद्यालये आदी ठिकाणच्या प्रक्षेत्रावर दरवर्षी रब्बी पिकांचे बिजोत्पादन घेण्यात येते. यंदा ज्वारीच्या विविध वाणांचे ६१ हेक्टरवर बिजोत्पादन होईल. घेण्यात येणार असून सुमारे ७९३ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. गव्हाचे ७.८० हेक्टरवर बिजोत्पादन होईल. १५६ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.  हरभऱ्याचे ५०.४० हेक्टरवर बिजोत्पादन, तर ३७८ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट, करडईचे १००.५० हेक्टरवर बिजोत्पादन, तर ७०३.५० क्विंटल बियाणे उत्पादन, जवसाचे २१.४० हेक्टरवर बिजोत्पादन, तर १०७ क्विंटल बियाणे उत्पादन, बाजरीचे ९ हेक्टरवर बिजोत्पादन, तर ९० क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. एकूण २५० हेक्टरवर रब्बी पिकांचे बिजोत्पादनाद्वारे सुमारे २ हजार २२७.५ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT