10 lakh Bt cotton in Jalgaon Supply of seed packets
10 lakh Bt cotton in Jalgaon Supply of seed packets 
मुख्य बातम्या

जळगावात १० लाख बीटी कापूस बियाण्याच्या पाकिटांचा पुरवठा

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. परंतु, कापूस बियाण्याची विक्री अजून सुरू झालेली नाही. ही विक्री या महिन्याच्या अखेरिस सुरू होणार आहे. सुमारे १० लाख बीटी कापूस बियाण्याच्या पाकिटांचा पुरवठा बुधवार (ता.६) पर्यंत झाला आहे. यामुळे लागवड जूनमध्ये सुरू होईल, अशी स्थिती आहे. 

कापसाची लागवड जिल्ह्यात मागील हंगामात पाच लाख सात हजार हेक्‍टरवर झाली होती. यंदा ही लागवड पाच लाख २५ हजार हेक्‍टरपर्यंत होण्याची शक्‍यता आहे. लागवड वाढणार असल्याने २५ लाख बीटी कापूस बियाण्याच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. हा पुरवठा खासगी पुरवठादार, कंपन्यांतर्फेच होणार आहे.

जिल्ह्यात प्रमुख पाच कंपन्यांकडून बियाणे पुरवठा बऱ्यापैकी झाला आहे. चार कंपन्यांच्या गोदामांमध्ये हे बियाणे साठविले आहे. तर, इतर कंपन्यांनी आपल्या वितरकांकडे पुरवठा केला आहे. तो सध्या संथ गतीने सुरू आहे. परंतु, मेच्या अखेरिस सुमारे १८ ते १९ लाख पाकिटे जिल्ह्यात उपलब्ध होतील, अशी माहिती मिळाली.  लागवड जूनमध्ये होण्याची शक्यता 

एकाच कंपनीच्या बियाण्यांचा कमी किंवा अधिक पुरवठा याकडेही कृषी विभागाने लक्ष दिले आहे. लिकिंगबाबत अजून विक्रेत्यांची तक्रार आलेली नाही. परंतु, ही तक्रार आली तर संबंधित कंपनीचे बियाणे जप्त किंवा विक्री बंदचे आदेश काढण्याची भूमिका कृषी विभागाने घेतली आहे. 

बियाणे उशिरा येणार असल्याने लागवड जूनमध्ये सुरू होईल. अनेक शेतकरी ही लागवड २, ३ जूननंतर करण्याचे नियोजन करीत आहेत. चोपडा, यावल, जळगाव, जामनेर, पाचोरा भागात कापूस लागवड अधिक होईल, असा अंदाज आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT