10 crore income to Barshi Market Committee 
मुख्य बातम्या

बार्शी बाजार समितीला १० कोटींचे उत्पन्न

सोलापूर ः ‘‘बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीस सन २०२०- २१ या आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले,’’ अशी माहिती बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः ‘‘बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीस सन २०२०- २१ या आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले,’’ अशी माहिती बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी दिली. 

राऊत म्हणाले, ‘‘बाजार समितीने कामासाठी प्राधान्यक्रम ठरवला. त्यातून प्रथम बाजार समितीतील अंतर्गत रस्ते, गटारी, वृक्षारोपण, दिवाबत्ती आदी मूलभूत सोयीसुविधांवर भर देऊन बाजार समितीच्या कामकाजात सुधारणा केल्या. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या मालाचे चोख वजन, रोख पट्टी यामुळे मराठवाडा व जिल्ह्यातील शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची स्पर्धा निर्माण होऊन व्यापारामध्ये वाढ झाली आहे.

पर्यायाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत आहे.’’  ‘‘२०२० - २१ या आर्थिक वर्षात मार्केट शुल्क अर्थात सेसच्या स्वरूपात ८ कोटी ८६ लाख ९७ हजार ३४७ रुपये, तर इतर १ कोटी १८ लाख २९ हजार २०६ असे एकूण १० कोटी ५ लाख २६ हजार ५५३ इतके उत्पन्न मिळाले. तर एकूण खर्च ५ कोटी ४४ लाख ५१ हजार ३७० रुपये इतका झाला. मागच्या वर्षात ४ कोटी ६० लाख ७५ हजार १८२ रुपये इतका वाढावा आहे,’’ असे राऊत यांनी सांगितले.

जनावरांसाठी शेड, शीतगृहे उभारणार

‘‘लातूर रस्त्यावर बाजार समितीच्या जागेत एक हजार टन क्षमतेचे दोन शीतगृह बांधकाम करणे, उपबाजार वैराग येथे एक हजार टन क्षमतेचे एक शीतगृह बांधकाम करणे, वैराग येथे जनावरांसाठी १५ निवारा शेड बांधणे, ही विकासकामे नियोजित आहेत,’’ असे राऊत यांनी सांगितले. 

सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

‘‘बाजार समितीत लवकरच सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करत आहोत. त्यामुळे विजेच्या बाबतीमध्ये बाजार समिती पूर्णपणे स्वावलंबी होणार आहे. समितीच्या वीज बिलात  दरमहा लाखो रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होईल,’’ असेही राऊत म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT