farm pond
farm pond 
मुख्य बातम्या

सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळी

Abhijeet Dake

सोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात २८८ शेततळी घेतली असून सुमारे ४८९.६० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे.  

एखादी योजना प्रभावीपणे राबविली तर ती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतेच. शासनाची मागेल त्याला शेततळे योजना राज्यात प्रभावीपणे राबविल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय सोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात दिसून आला आहे. कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात २८८ शेततळी घेतली असून सुमारे ४८९.६० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सोनी गाव. तसे पाहिले तर या गावातून म्हैसाळ उपसा योजनेचे पाणी जात असले तरी पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या गावाची लोकसंख्या सुमारे ६,२५० इतकी असून भौगोलिक क्षेत्र १,९११ हेक्टर इतके आहे. सरासरी पर्जन्यमान ५५० मिलिमीटर आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील गावातील शेतकऱ्यांनी दर्जेदार द्राक्ष उत्पादनामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे.    कृषी विभागाने शेततळे योजनांची माहिती गावात पोहोचवली. शाश्वत पाण्याची सोय होते, आणि याला अनुदानही मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेततळी घेण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये उच्चांकी संख्येने शेततळी मंजूर केली. बागायत शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेत पाणीसाठा केला. गेल्या काही वर्षांत म्हैसाळ योजनेतून नियमित उपसा होऊ लागल्याने शेतकरी बागायती पिकांकडे वळले. गावशिवारात द्राक्ष, उसाचे क्षेत्र वाढले.  शासनाच्या अनुदानातून सोनी गावात २८८ शेततळी शेतकऱ्यांनी घेतली आहेत. द्राक्ष बागायतीमधून आर्थिक कायापालट करणाऱ्या सोनीच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी शेततळ्यांचा आधार घेतला. संपूर्ण द्राक्ष शेतीला या शेततळ्याचा आधार मिळाला आहे.

  • सामुहिक शेततळी ः ३२
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना ः १५
  • एकात्मिक कडधान्य योजना ः ०७
  • मागेल त्याला शेततळे ः २३४
  • एकूण ः २८८
  • आमच्या भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेततळी घेतली आहेत.  त्यामुळे शाश्वत पाण्याची सोय झाल्याने गावात द्राक्ष लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. — सतीश जाधव, सोनी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

    Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

    Earthquake Migration : लोकप्रतिनिधींची मागणी, फरफट सर्वसामान्यांची

    Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

    Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

    SCROLL FOR NEXT