grass cultivation
grass cultivation 
मुख्य बातम्या

गाव करतेय गवतांचे संवर्धन

Gopal Hage

 शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले वऱ्हाडातील सिंदखेड लपाली (ता. मोताळा जि. बुलडाणा) हे गाव विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करीत आहे. वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन, मृदा सवंर्धन, पाणी अडविणे, पाणी जिरवणे असे उपक्रम राबवून  शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढविणे तसेच जोडधंद्यातून विकास साधणे यावर हे गावकरी भर देत आहेत. जल, जमीन आणि जंगल या त्रिसुत्रीचा वापर करून  गाव स्वयंपूर्णतेच्या मार्गावर निघाले आहे. गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय जमिनीवर सरपंच विमल कदम यांनी पुढाकार घेत राहुरी व पुरंदर येथून अंजन, पवना, माली कुसाडी आदी गवतांचे बियाणे आणून गावकऱ्यांच्या मदतीने लागवड केली आहे. या गवताचे संगोपन करून गावाचे ओसाड शिवार हिरवेगार करण्याचा निर्धार गावाने केला आहे. यामुळे गावातील जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होईल,तसेच दूध उत्पादन वाढविण्यासही हातभार लागणार आहे.  सिंदखेड लपाली येथील ग्रामस्थ आता गवत काढून टाकण्याचे किंवा जाळून टाकण्याचे काम करीत नसून गावशिवारात गवताचे संगोपन करीत आहेत. गावाने वॉटर कप स्पर्धा, स्वच्छता स्पर्धांमध्ये सहभाग घेत पुरस्कार मिळविले आहेत. आता गावकरी स्वयंपुर्णतेसाठी काम करीत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT