संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील चौदा हजार कर्मचाऱ्‍यांना प्रोत्साहनपर भत्ता

टीम अॅग्रोवन

पुणे  : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोखीम पत्कारून गावस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. जिल्ह्यातील १४ हजार ११६ जणांना प्रोत्साहन भत्याचा लाभ मिळणार आहे. कोरोनाच्या निर्मुलनासाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विम्याचे सुरक्षा कवचदेखील जिल्हा परिषदेकडून देण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील ५ हजार २३८ ग्रामपंचायत कर्मचारी, ३ हजार २९२ अंगणवाडी सेविका, २ हजार ६८९ अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर २ हजार ८९७ असे कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना उपाययोजनांसाठी आवश्‍यक विविध जबाबदाऱ्या पार पडल्या जात आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवणे, क्वारंटाइनच्या सूचना देणे, शासनाचे आदेशानुसार आवश्‍यक कामे करणे आदी कामे केली जात आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतन, मानधनाव्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहेत.

आंबेगाव तालुक्यातील १ हजार ३००, बारामती तालुक्यातील १ हजार ३७, भोरमधील ६७५, दौंड तालुक्यातील ७८८, हवेलीतील १ हजार ६४१, इंदापूरमधील ९५६ , जुन्नरमधील १ हजार ५८९, खेडमधील १ हजार ३९१, मावळमधील १ हजार २०३, तर मुळशीमधील ८५४, पुरंदरमधील १ हजार १२, तर शिरूरमधील १ हजार ३७४ आणि वेल्हे तालुक्यातील २९६ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून १ कोटी ४१ लाख १६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT