छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे लोकार्पण करताना मान्यवर
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे लोकार्पण करताना मान्यवर 
मुख्य बातम्या

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ः शरद पवार

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : या देशात राजे अनेक झाले, पण ज्या वेळी समाजाचे सत्व गेले होते, त्या वेळी समाजाला संघटित करण्याचे काम छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केले. त्यांचे हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. 

येथील दसरा चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे लोकार्पण श्री. पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. १९) झाले. त्या वेळी ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, की शाहू महाराज यांनी सत्ता ही उपेक्षित घटकांसाठी वापरली. त्यांनी शिक्षण, शेती, मल्ल विद्या, उद्योग, व्यापार यांचा व्यापक विचार केला होता. तसेच एका ठिकाणी शाहू महाराजांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या पहिलवानाशी कुस्ती जिंकून, कुस्ती ही शक्तीने नाहीतर युक्तीने जिंकता येते हे दाखवून दिले. शाहू महाराज यांच्या कार्याचा देशातील अनेक ठिकाणी गौरव केला जात होता. त्या काळी आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय खूप मोठा असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

या वेळी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, इतिहासतज्ज्ञ जयसिंग पवार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT