संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण 

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सज्ज झाली असून पुढील कार्यवाही तातडीने सुरु करण्यात आली आहे. 

हा कोरोना बाधित रुग्ण ३० वर्षाचा तरुण असून तो निफाड तालुक्‍यातील आहे. त्याचा तपासणीसाठी पाठवलेला ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण तपासणीसाठी पाठविलेल्या ९ नमुन्यांपैकी आठ नमुने निगेटिव्ह आले असून एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याचा अहवाल प्राप्त होताच प्रशासन सतर्क झाले आहे. 

जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव (ता.निफाड) जवळील नंदनवननगर, पिंपळगावनजीक येथील रहिवासी असलेला हा कोरोना बाधित तरुण रजानगर येथील बेकरीत कामाला होता. १२ मार्चला खोकला व ताप आल्याने त्याने खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले; परंतु त्याला बरे न वाटल्याने तो लासलगाव ग्रामीण रुग्णालयात २५ मार्चला उपचारासाठी गेला. न्यूमोनियासदृश लक्षणे दिसत असल्याने त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

संबंधित तरुण स्वत:च्या वाहनाने २७ मार्चला नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला. त्याला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने विलगीकरण कक्षात दाखल केले. त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी (ता. २९) प्राप्त झाला, त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. विलगीकरण कक्षात दाखल सात रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ती सुधारत आहे. 

कुटुंबातील चौघे क्वारंटाइन   जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या संनियंत्रणानुसार कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील चौघांना क्वारंटाइन कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हा आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांचे पथक लासलगाव येथे रवाना झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला युवक हा निफाड येथे गेला असता त्यास ‘कोरोना’ची लागण झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्यादृष्टीने निफाड परिसरात कोण परदेशातून आले आहे का याचा शोध घेतला जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT