कैरीच्या सालाचे नॅनोकण करतील प्रदूषण कमी
कैरीच्या सालाचे नॅनोकण करतील प्रदूषण कमी 
मुख्य बातम्या

कैरीच्या सालाचे नॅनोकण करतील प्रदूषण कमी

वृत्तसेवा

कैऱ्यांच्या सालीपासून मिळवलेल्या अतिसूक्ष्म कणांचा उपयोग मातीतील तेलांचे प्रदूषण कमी करण्यासाठी होऊ शकत असल्याचे ऑस्ट्रेलियातील संशोधनामध्ये आढळले आहे. हे संशोधन ‘एनव्हायर्न्मेंट टेक्नॉलॉजी अॅण्ड इनोव्हेशन’ या पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे. पेट्रोलियम उद्योगासाठी तेलमिश्रित चिखलचा पुनर्वापर करणे हे तुलनेने अधिक खर्चिक आणि आव्हानात्मक ठरते. तेल प्रक्रिया विधीमध्ये मातीत मिसळल्यामुळे सुमारे ३ ते ७ टक्के तेल वाया जाते. ते पुन्हा मिळवता येत नाही. त्या बरोबर प्रदूषणामुळे पर्यावरणाची समस्या उद्भवून परिसंस्थेची होते. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया येथील संशोधक डॉ. बिरुक देसालॅग्न यांनी याबाबत संशोधन केले आहे. त्याविषयी माहिती देताना डॉ. देसालॅग्न म्हणाले की, गेल्या वर्षी जागतिक तेल उत्पादन सर्वोच्च पातळीवर म्हणजे प्रति दिन ९२.६ दशलक्ष बॅरल प्रति दिवस पोचले. मात्र, तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा होत असूनही तेल रिफायनरीद्वारे मोठ्या प्रमाणात मातीचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामध्ये विविध विषारी आणि कर्करोगकारक घटक असतात. त्याचा अन्य सजिवाबरोबर माणसांवरही परिणाम होतो. तेलाच्या विषारीपणा आणि भौतिक गुणधर्मामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बदल होत गेले आहे. थोडक्यात, वातावरणामध्ये त्यांचे विषारी घटक निर्मितीची प्रक्रियाही बदलत आहे. या प्रदूषणकारी घटकांच्या विघटनासाठी गेल्या काही वर्षांपासून नॅनो कणांचा वापर वाढत आहे. अशा नॅनो कणांच्या निर्मितीसाठी सध्या विविध वनस्पतीजन्य घटकांचा वापर केला जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या संशोधनामध्ये कैऱ्यांच्या सालीच्या अर्कामध्ये आयर्न क्लोराईड मिसळून त्यापासून नवीन नॅनोकण मिळवण्यात आले. हे कण तेलमिश्रित मातीच्या प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले. या कणांमुळे तेलमिश्रित मातीतील विषारी घटकांचे रासायनिक ऑक्सिडेशन प्रक्रियेद्वारे विघटन होते. परिणामी प्रदूषणकारी घटक नष्ट होतात. हे ९० टक्क्यापर्यंत कार्यक्षम असल्याचे डॉ. देसालॅग्न यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT