सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या जैवविविधतेसाठी उपयुक्त 
मुख्य बातम्या

सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या जैवविविधतेसाठी उपयुक्त

वृत्तसेवा

फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील संशोधनामध्ये सेंद्रिय पद्धतीच्या पशुपालनामुळे पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच कृषी क्षेत्रामध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दिले जाणारे अनुदानाचा चांगला परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर दिसून येईल. फिनलँडसह युरोपमध्ये कृषी क्षेत्रातील पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी पक्ष्यांची जैवविविधता टिकवण्यासाठी कृषी- पर्यावरण अनुदानाचा पर्याय पुढे आला आहे. जैवविविधतेचे महत्त्व शास्त्रज्ञांसह सामान्यांपर्यंत जाणवू लागले आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नाची उपलब्धता करण्यासाठी कृषी क्षेत्र वाढत जात आहे. अशा वेळी कृषी क्षेत्रामध्येच जैवविविधता वाढविण्यासाठी युरोपीय संघाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कृषी क्षेत्राला अनुदान देण्याचे नियोजन केले जात आहे. पर्यावरणाला उपयुक्त ठरेल, अशाप्रकारे कृषी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी हे अनुदान दिले जाते. अशा पद्धतींचा शोध घेण्यासाठी फिनलँडमध्ये हेलसिंकी विद्यापीठामध्ये इरिना हेरझॉन यांनी संशोधन केले आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या सेंद्रिय शेती, पशुपालन यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला आहे. फिनलॅंड येथील बहुतांशी सेंद्रिय शेतांमध्ये उन्हाळ्यात मुक्त संचार पद्धतीने पशुपालन केले जाते. कुरणांमध्ये उपलब्ध असलेल्या गवतांच्या विविधतेसोबतच कीटकांनाही त्याचा फायदा होत आहे. जनावरांच्या शेणांमुळे वनस्पतींच्या प्रजातींसाठी खतांची उपलब्धता होत आहे. अशा शेतामध्ये कीटकांची वाढलेली संख्या पक्ष्यांना आकर्षित करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याविषयी माहिती देताना हेलसिंकी विद्यापीठांतर्गत कार्यरत फिनिश म्युझियम ऑफ नॅटरल हिस्ट्री लेमाऊस येथील संशोधक अलेक्सी लेहिकोईनेन यांनी सांगितले, की फिनलँडमध्ये कॉमन स्वॉलो आणि हाऊस मार्टिन यांसारख्या पक्ष्यांची संख्या अत्यंत कमी झाली असून, या प्रजाती धोक्यामध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती आणि पशुपालन यांचे एकत्रीकरण अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे अभ्यासामध्ये दिसून आले आहे. दैनंदिन गरजांसाठी सेंद्रिय उत्पादनांची खरेदी करण्याच्या साध्या उपायांनीही सेंद्रिय शेती आणि जैवविविधता यांच्या वाढीला फायदा होऊ शकतो. कृषी, पर्यावरण आणि हवामानविषयक अनेक अनुदानांची सांगड सेंद्रिय पशुपालनांशी घातल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. यासाठी करांमध्ये योग्य त्या सवलती देण्यासोबतच सेंद्रिय उत्पादनांच्या खरेदी-विक्रीला चालना दिली पाहिजे. यातून शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेती फायद्याची होणार असल्याने पर्यावरण, हवामान आणि जैवविविधता यासाठी विन विन परिस्थिती तयार होईल.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT