जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक 
मुख्य बातम्या

जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक

वृत्तसेवा

अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून होणाऱ्या अप्रक्रियायुक्त नायट्रेटचा वहनाविषयीचा २१ वर्षांपासून सुरू असलेला दीर्घ आणि मोठा अभ्यास नुकताच पूर्ण केला. त्यात जैविक उचल होण्यासाठी काही नायट्रेट हा हंगामी काळात वेगाने वहन होतो, त्यामुळे अप्रक्रियायुक्त नायट्रेट या जैविक प्रक्रियांना बायपास करून पुढे निघून जातो. पाऊस आणि हिमवर्षावाबरोबर वातावरणातील नायट्रोजन जमिनीवर येतो. त्याचा वापर जंगलातील वनस्पती आणि सूक्ष्मजीवांमार्फत केला जातो. मात्र, असा पावसासोबत येणारा नायट्रोजन मोठ्या प्रमाणात प्रवाहामार्फत वाहून जातो. अमेरिका आणि कॅनडा येथील उत्तरेतील जंगलामधील अशा अप्रक्रियायुक्त नायट्रेटच्या प्रवाहांचा अभ्यास अमेरिकी वनसेवेतील संशोधक स्टिफन सेबेस्टियन यांच्यासह अमेरिका, कॅनडा आणि जपान येथील विविध १२ संस्थांतील २९ सहकाऱ्यांनी केला आहे. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल एनव्हायर्नमेंटल सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. जंगलातील वनस्पतींसह सूक्ष्मजीवांकडून नायट्रोजनचे एक स्वरूप नायट्रेटचा वापर होतो. अर्थात, मोठ्या पावसामध्ये पाण्याचा प्रवाह अधिक वेगवान असल्याने या जैविक प्रक्रियांना टाळून ते पुढे विविध पाण्याच्या स्रोतामध्ये समाविष्ट होतात. संशोधकांनी गेल्या २१ वर्षांमध्ये १३ राज्यांतील पाण्याचे नमुने गोळा करून त्याचे विश्लेषण केले. यासाठी सुमारे १८०० पेक्षा अधिक नायट्रेट आयसोटोप्सचे विश्लेषण करण्यात आले. त्याविषयी माहिती देताना स्टिफन सेबेस्टियन यांनी सांगितले, की नायट्रोजन हा पृथ्वीवरील जैविक प्रक्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, त्याचे प्रमाण ज्या वेळी अधिक असते, त्या वेळी पाण्यासह विविध पर्यावरणीय घटकांमध्ये प्रदूषक म्हणूनच पाहिला जातो. हे नायट्रोजनचे प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या विविध प्रक्रियांचा व्यवस्थित अभ्यास करण्याची आवश्यकता होती. जंगलातील नायट्रेटचे प्रदूषण फार दूरपर्यंत वाहून जात नाही, असा संशोधकांचा सामान्य अंदाज होता. कारण, जंगलामध्ये वनस्पतींची गर्दी आणि त्यावर आधारित विविध सूक्ष्मजीवांचे मोठे प्रमाण या गाळणयंत्रणेतून नायट्रेटचा प्रवास होतो. मात्र, त्यांच्याकडून प्रक्रियेमध्ये न घेतला गेलेल्या नाटट्रेट प्रवाहात येतो आणि काही वेळा त्याचे प्रमाण अनपेक्षितरित्या अधिक असते. या वाहून गेलेल्या नायट्रोजनमुळे जंगलामध्ये त्याची कमतरता भासून, तलाव आणि जलस्रोतांमध्ये शेवाळांचे प्रमाण वाढते. झाडांच्या प्रजाती या नत्रासाठी विविध पातळीवर सहनशील असतात. त्यातही अधिक प्रमाणातील नायट्रोजनमुळे जंगलाच्या संरचनेत बदल होऊन, अस्थानिक वनस्पतींची वाढ होण्यास मदत होते. संशोधक ट्रेन्ट विकमन यांनी सांगितले, की आम्ही हवेच्या प्रदूषणाचे जंगल आणि जलसंधारण विभागावरील परिणामाविषयी अधिक काळजीत होतो. वाहने आणि औद्योगिक स्रोतांतून होणाऱ्या नायट्रोजनच्या प्रदूषणाविषयी सातत्याने मोजमाप करून ते कमी करण्यासाठी कार्यक्रम राबवले जातात. सोबतच भविष्यामध्ये जंगलाच्या आरोग्याबरोबरच त्यातून प्रवाहित होणाऱ्या नत्राच्या प्रमाणावरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. नायट्रेटचे अनेक आयसोटोप्स हे नैसर्गिक झाडींमध्ये गाळले न जाता पुढे जात असल्याचे दिसून आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT