जल वनस्पती कमी करतील तलावातील प्रदूषण
जल वनस्पती कमी करतील तलावातील प्रदूषण 
मुख्य बातम्या

जल वनस्पती कमी करतील तलावातील प्रदूषण

वृत्तसेवा

तलावातील प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींचा वापर करणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत साउथ डाकोटा राज्य विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये डकवीडसारख्या वनस्पती तलावाच्या पाण्यातील स्फुरद आणि नायट्रेट घटकांचे व जड धातूंचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. या वनस्पतींचा वापर पशुखाद्यासाठीही होऊ शकतो. साउथ डाकोटा राज्यातील पाण्यामध्ये डकवीड या वनस्पतींची वाढ कऱणे आणि त्याचा पशुखाद्यासाठी वापर करणे यासाठी एका संशोधन प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. या पाणी प्रकल्पामध्ये डकवीड वेगाने वाढले. दर आठवड्याला शेकडो किलो डकवीड त्यातून उपलब्ध झाले. पाण्यातील स्फुरदाचे प्रदूषण कमी करण्यासाठी डकवीडचा वापर करणे शक्य असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. ही वनस्पती पाण्यामध्ये वेगाने वाढते. तिला गरम आणि सावकाश प्रवाहित होणारे पाणी मानवते. पाण्यातून या वनस्पतींची काढणी करणे सोपी आहे. ते ताज्या किंवा वाळवलेल्या स्वरूपामध्ये जनावरांना खाद्य म्हणून देता येते. त्यात प्रथिनांचे प्रमाण १६ टक्के आहे. त्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी या वनस्पतींच्या वापरासाठी अभ्यास करण्यात येत आहे. पशुखाद्यामध्ये वापरण्यासंदर्भात अभ्यास ः प्राणीशास्त्र विषयाच्या प्रा. ज्युली वॉकर यांनी डकवीड वाळवून, त्याचा कमी प्रमाणात पशुखाद्यामध्ये वापर कऱण्यासंदर्भात अभ्यास केला. हे पशुखाद्य ६० ते ९० दिवसांपर्यंत ठेवल्यानंतर त्यातील प्रथिनांचे प्रमाण किचिंत कमी होते. ९० दिवसांपर्यंत साठवल्यास त्यात अमोनियाची वाढ होते. या अभ्यासात कोणतीही विषारी घटकांची निर्मिती झाल्याचे आढळले नाही. अर्थात, पुढील टप्प्यामध्ये डकवीड आणि त्यात शोषलेले जड धातूंच्या जनावरांवरील परीणामांचा अभ्यास करण्यात येणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT