फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान आणि उपचारांना प्रतिसाद यातून वैयक्तिक उपचार प्रणाली तयार करणे शक्य होईल.
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान आणि उपचारांना प्रतिसाद यातून वैयक्तिक उपचार प्रणाली तयार करणे शक्य होईल.  
मुख्य बातम्या

कर्करोगाच्या वैयक्तिक उपचाराकडे वाटचाल सुरू

कोजेन्सिस वृत्तसेवा

सिंगापूर येथील संशोधकांनी २९ पेशीबाह्य जनुकांचे एक पॅनेल ओळखले आहे. त्यावरून फुफ्फुसाच्या कर्करोगांच्या रुग्णांच्या औषधोपचाराला असणाऱ्या प्रतिक्रियांचा अंदाज मिळू शकत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. यामुळे रुग्णनिहाय औषधोपचार पद्धती वापरणे व त्याचे धोके कमी करणे शक्य होईल. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हे स्त्रिया आणि पुरुषांच्या जिवाला धोका व मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या रोगांमध्ये येतो. या रोगाच्या उपचाराला प्रारंभ करण्यापूर्वी केमिओथेरपीसारख्या पद्धतीचा अवलंब केला जातो. अशा उपचारांना रुग्ण कशा प्रकारे प्रतिसाद देतो, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पारंपरिक पद्धतीमध्ये सर्वांसाठी एकच उपचार प्रणालींचा वापर होतो. मात्र, दोन माणसांना जरी एकाच प्रकारचा कॅन्सर (कर्करोग) झाला, तरी कर्करोगांंच्या पेशींची वाढ, त्यांच्या पसरण्याचा वेग हा वेगवेगळा असल्याचे  सिंगापूर येथील राष्ट्रीय विद्यापीठातील प्रो. लिम चिवी टेक यांनी सांगितले.     रुग्णनिहाय उपचार प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने लिम आणि त्यांचे सहकारी संशोधन करीत आहेत. त्यांना जनुकीय माहिती साठ्यातून फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्यान्वित होणाऱ्या पेशींचा (एक्स्ट्रासेल्युलर मॅिट्रक्स -इसीएम) शोध लागला. त्यातील २९ इसीएम घटक रोगाचे निदान आणि वाढीविषयी बायोमार्कर म्हणून उपयुक्त ठरू शकतात. २००० पेक्षा अधिक फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सुरवातीच्या स्थितीमध्ये असलेल्या रुग्णांवर याच्या चाचण्या घेण्यात आल्या. या जनुकांच्या कार्यामुळे केमाेथेरपीच्या यशाचा दराचा अंदाज मिळतो, हे लक्षात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT