We will give interest refund to the District Bank from NABARD 
मुख्य बातम्या

सोलापूर ः जिल्हा बँकेचा नाबार्डकडील थकीत व्याजपरतावा देऊ 

सोलापूर ः नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक गोवर्धनसिंग रावत हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते. या वेळी बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याचे पाहून कौतुक केले. तसेच बँकेला नाबार्डकडील व्याज परतावा अदा करण्याचे आश्‍वासन दिले.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक गोवर्धनसिंग रावत हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदिच्छा भेट दिली. या वेळी बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याचे पाहून कौतुक केले. तसेच बँकेला नाबार्डकडील व्याज परतावा अदा करण्याचे आश्‍वासन दिले. 

बँकेचे सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे यांनी त्यांचे स्वागत केले. बँकेच्या प्रगतीचा आढावा त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर श्री. रावत म्हणाले, ‘‘ठेव संकलनात गेल्या तीन वर्षांत १५५० कोटी रुपये वाढले आहेत. तसेच कर्जात ४६० कोटींची वाढ झाली आहे. नाबार्डने केलेल्या विशेष लेखापरीक्षणात (रेटिंग क्लासिफिकेशन) बँकेचा वर्ग ‘क’ मधून ‘ब’मध्ये समाविष्ट झाला. प्रशासक शैलेश कोतमिरे यांचे सूक्ष्म नियोजन कामी आले, अशा शब्दांत त्यांनी बँकेच्या कामकाजाचा गौरव केला. या वेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, बँकेचे व्यवस्थापक आर. एन. जाधव, सहायक व्यवस्थापक आर. डी. गोटे उपस्थित होते. राजेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आबा भडंगे यांनी आभार मानले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT