Vitthalrao Shinde leads in Solapur district, Pandurang leads in Uttar Pradesh 
मुख्य बातम्या

सोलापुरात जिल्ह्यात गाळपात ‘विठ्ठलराव शिंदे’,  उताऱ्यात ‘पांडुरंग’ ची आघाडी 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्यातील पांडुरंग, सहकारमहर्षी, विठ्ठलराव शिंदे या कारखान्याने गाळपामध्ये चांगली आघाडी घेतली आहे.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्यातील पांडुरंग, सहकारमहर्षी, विठ्ठलराव शिंदे या कारखान्याने गाळपामध्ये चांगली आघाडी घेतली आहे. विशेषतः विठ्ठराव शिंदे कारखान्याने सर्वाधिक गाळपात तर पांडुरंग कारखान्याने सर्वाधिक उताऱ्यात आघाडी घेतली आहे. आजही सुमारे १५ लाख टनांहून अधिक ऊस शिल्लक असल्याने साधारण एप्रिलअखेर गाळप सुरु राहील, अशी शक्यता आहे. 

जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ साखर कारखाने आहेत. त्यापैकी ३१ कारखान्यांतून यंदा गाळप सुरु झाले. जिल्ह्यातील सर्वाधिक गाळप क्षमता असलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने १८ लाख ७९ हजार टन उसाचे गाळप केले आहे. सहकारमहर्षी साखर कारखान्याने १४४ दिवसांत ११ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप केले आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने १० लाख ५६ हजार टन उसाचे गाळप केले आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने ९ लाख ७६ हजार टन तर लोकनेते अनगर या कारखान्याने ७ लाख २९ हजार टन उसाचे गाळप केले आहे. युटोपीयन शुगर्स ६ लाख २४ हजार टन उसाचे गाळप केले आहे. सासवड माळी शुर्गसने १४९ दिवस, पांडुरंग सहकारीने १४७ दिवस पूर्ण केले आहेत. गाळपात विठ्ठलने आघाडी घेतली, पण पांडुरंग कारखान्याने सरासरी उताऱ्यात चांगली आघाडी घेतली. कारखान्याचा उतारा सरासरी १० टक्क्यांच्याही पुढे राहिला.  ...म्हणून अतिरिक्त उसाचा प्रश्न कमी  यंदा श्री विठ्ठल, मकाई, आदिनाथ हे मोठे साखर कारखाने बंद राहिले. मात्र शेतकरी-सांगोला, शंकर- माळशिरस, सीताराममहाराज- खर्डी, विजय शुगर्स- करकंब, कर्मयोगी- आष्टी हे गेल्या काही वर्षापासून बंद असलेले साखर कारखाने यंदा कधी नव्हे, ते चांगले चालले. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न राहिला नाही. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु, शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषिमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Women Empowerment: महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी प्रयत्नशील

Farmer Protest: आंबा, काजू बागायतदारांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला

PAN Card Rules: पॅन कार्ड प्रक्रियेत मोठे बदल; १ एप्रिलपासून नवे नियम लागू, जाणून घ्या माहिती

Sugarcane FRP: सांगलीतील १० कारखान्यांकडे २८० कोटी एफआरपी थकीत

SCROLL FOR NEXT