Tree planting scheme will be resumed in Parola 
मुख्य बातम्या

पारोळ्यात वृक्ष लागवड योजना पुन्हा सुरू होणार 

पारोळा, जि. जळगाव : तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक वृक्षलागवडीच्या १ हजार ६७ शेतकऱ्यांची वर्कऑर्डर निघाली असून, या कामांचे मस्टर काही दिवसांपूर्वी झिरो करण्यात येऊन नवीन कामे थांबविण्यात आली होती.

टीम अॅग्रोवन

पारोळा, जि. जळगाव : तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक वृक्षलागवडीच्या १ हजार ६७ शेतकऱ्यांची वर्कऑर्डर निघाली असून, या कामांचे मस्टर काही दिवसांपूर्वी झिरो करण्यात येऊन नवीन कामे थांबविण्यात आली होती. ते काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तालुक्यातील सरपंचांनी मंगळवारी (ता.२३) पंचायत समिती आवारासमोर ठिय्या आंदोलन केले होते.  या आंदोलनाची आमदार चिमणराव पाटील व माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दखल घेत संबंधित काम सुरू करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून गटविकास अधिकारी यांना सूचना करीत काम सुरू करण्याचे सांगितले. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वैयक्तिक वृक्ष लागवड कामाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला.  न्याय मिळावा हीच भूमिका : चिमणराव पाटील  तालुक्यात वृक्ष लागवड योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून योजना पूर्ववत सुरू करण्याचे गटविकास अधिकारी यांना सूचित केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Crop Disease: तुरीवरील वांझ रोगास कारणीभूत कोळीचे नियंत्रण

Vermicompost Production: गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन

Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

Homemade Cake Processing: केक, चॉकलेट निर्मितीतून तयार झाली ओळख

Weekly Weather: राज्यात हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT