Solapur: Milk union premises will be rented out, milk collection will be increased 
मुख्य बातम्या

सोलापूर ः दूध संघाच्या जागा भाड्याने देणार, दूध संकलन वाढवणार 

सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या महामार्गावरील मालकीच्या जागा भाड्याने देत उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय नव्या संचालक मंडळाच्या रविवारी (ता.१३) पहिल्याच बैठकीत घेण्यात आला.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या महामार्गावरील मालकीच्या जागा भाड्याने देत उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय नव्या संचालक मंडळाच्या रविवारी (ता.१३) पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय संघाचे मुख्य कार्यालयही केगाव येथे हलवण्याचा निर्णय बैठकीत झाला. 

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालकांची पहिली बैठक संघाच्या मुख्यालयात बोलविण्यात आली होती. संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्हा दूध संघाच्या केगाव आणि टेंभुर्णी येथे अगदी मोक्यावर जागा आहेत. या जागेवर व्यापारी गाळे बांधून ते भाड्याने देण्याचा प्रस्ताव अध्यक्ष शिंदे यांनी ठेवला. त्यांच्या या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला. त्याशिवाय शहरातील मुख्य कार्यालय केगाव येथील संकलन केंद्रावर हलवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावरही सर्वांनी सहमती दर्शवली. संघाचे तोट्यात चालणारे वाहतूक मार्ग बंद करून सोलापूर शहरातच दुधाचे ग्राहक वाढविण्याबाबत आणि एकूणच जिल्ह्यातील दूध संकलन वाढण्यावर यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले. पंढरपूर येथील संघाची इमारतही भाडेतत्त्वावर देणे, टेंभुर्णी येथील इमारत भाडेतत्त्वावर देणे, महामार्गासमोरील जागेत २९ गाळे बांधून भाडेतत्त्वावर चालविण्यास देणे, बार्शी येथील बंद पशुखाद्य कारखाना चालविण्यासाठी भाड्याने देणे, मंगळवेढ्यातील जागेचे राष्ट्रीय महामार्गाकडून ३१ लाख रुपये येणे आहेत. ते मिळवून कर्मचाऱ्यांचे वेतन देणे यासारखे निर्णयही या बैठकीत ठरले.  गाईच्या दूध दरात वाढ करणार  जिल्हा दूध संघाच्या प्रशासकीय कामकाजात संगणकप्रणालीसह पारदर्शकता आणि सूसुत्रता आणण्यात येणार आहेच. पण सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे दूध संकलनही वाढवण्यात येणार आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून गाईच्या दूध खरेदी दरात किमान दोन रुपये वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT