Public hearing of 14 sand auction group in Jalgaon district
Public hearing of 14 sand auction group in Jalgaon district 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १४ वाळू लिलाव गटाची जनसुनावणी 

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात भडगाव, पाचोरा, चोपडा येथील तीन वाळू गटांचे लिलाव झाले आहेत. १४ वाळू गटांची जनसुनावणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण विभागाने घेतली. वाळू गटांबाबत राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रदूषण नियंत्रण विभाग अहवाल सादर करणार आहे. राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या बैठकीत या गटांना मंजुरी मिळेल, अशी माहिती जिल्हा गौण खनिज विभागाच्या सूत्रांनी दिली. 

आव्हाणे येथे वाळूचा अवैधरीत्या उपसा होतो. तरीही तेथील ग्रामपंचायतीने वाळू उपसाबाबत ठराव केलेला नाही. यामुळे आता या ठिकाणची वाळू चोरी झाल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर येणार आहे. जी गावे वाळू उपसाबाबत ठराव करणार नाहीत, अशा गावातील वाळूच्या उपशास गावच जबाबदार राहील, असा अध्यादेश शासनाने काढलेला आहे. त्यानुसार ही कारवाई होणार आहे.  या गटांचे होतील लिलाव  मुक्ताईनगर तालुक्यात दोन गट, रावेर सहा गट, जळगावचे दोन गट, धरणगावमधील बाभूळगाव एक व दोन, अमळनेर येथील दोन गटांचे लिलाव होणार आहेत. सोबतच टाकरखेडा येथील वाळू गटाचा लिलाव होणार आहे. 

अवैध वाळू उपशावर नियंत्रण नाहीच  गिरणा नदीपात्रातील वाळू ठेके बंद असले, तरी मध्यरात्रीनंतर वाळूउपसा सुरूच आहे. शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. तेथे पाहणी केली असता मध्यरात्रीनंतर बांधकामाजवळ वाळू टाकलेली दिसते. ही वाळू डंपरमधून टाकलेली दिसते. महसूल, पोलिसांना चकवा देत वाळूमाफिया वाळूचा अवैध उपसा करतात. त्यावर अद्याप तरी नियंत्रण नसल्याचे दिसून येते.  वाळू गटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. पर्यावरण समितीची मंजुरी मिळताच लिलाव होतील. अवैध वाळूउपशावर नियंत्रणासाठी महसूल यंत्रणा कार्यरत आहे. अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.  - दीपक चव्हाण,  जिल्हा गौण खनिज अधिकारी, जळगाव   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT