Provide electricity for agriculture for eight hours a day 
मुख्य बातम्या

शेतीसाठी दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :कृषी समितीच्या सभेत ठराव 

धुळे : रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपांना पुरेशा दाबाने दिवसा आठ तास वीजपुरवठा करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संग्राम पाटील यांनी दिल्या.

टीम अॅग्रोवन

धुळे : रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपांना पुरेशा दाबाने दिवसा आठ तास वीजपुरवठा करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संग्राम पाटील यांनी दिल्या. 

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा नुकतीच झाली. सभापती श्री. पाटील अध्यक्षस्थानी होते. सदस्य प्रतिभा सूर्यवंशी, बेबीबाई पावरा, भीमराव ईशी, सखूबाई पारधी, महावीरसिंग रावल, ललित वारुडे, मीनल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वि. भा. जोशी, कृषी विकास अधिकारी पी. एम. सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी उज्वलसिंग गिरासे, कावेरी राजपूत, पी. एस. चौधरी, हेमंत ठाकूर, आर. टी. पवार आदी उपस्थित होते. 

रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, कांदा व इतर रब्बी पिकांची लागवड केली आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. परिणामी रोहित्र जळणे, रात्रीच्या वेळेस विद्युत पुरवठा होणे यासारख्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी किमान आठ तास दिवसा पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. यासाठी महावितरण कंपनीने सूक्ष्म नियोजन करून शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवाव्यात अशा सूचना सभापती श्री. पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. लघू व मध्यम प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार नियोजन करून शेतकऱ्यांना पाण्याचे आवर्तन सोडण्याची सूचनाही त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: शेतकऱ्यांचे जातधर्मविरहित संघटन हे आशावादी चित्र

CM Devendra Fadnavis: आधुनिक उत्पादन क्षेत्रासाठी ‘राज्य अभियान’ राबविणार

Kolhapur Farmer Protest: कोल्हापुरात आंदोलनामुळे ऊसतोडणीला अडथळे कायमच

Pune APMC: बाजार समितीमध्ये स्वच्छता गृहाच्या घोटाळ्याला खतपाणी

Fish Farmers Relief: राज्यात मत्स्य व्यावसायिकांना अतिवृष्टीच्या मदतीचे दर निश्चित

SCROLL FOR NEXT