Plantation of 90,000 fruit trees by farmers in Nanded district 
मुख्य बातम्या

 नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून ९० हजार फळझाडांची लागवड 

टीम अॅग्रोवन

नांदेड : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात कृषी विभागाकडून ६०३ हेक्टरवर विविध फळपिकांची ८८ हजार ९३२ फळझाडांची लागवड केली आहे. यात सर्वाधीक २७ हजार ७६० फळझाडे सीताफळांची आहेत. आगामी काळात फळबागेच्या लागवडीत वाढ होईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.  जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्वच गावात फळबागेची लागवड करता येते. तर नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ठराविक गावात फळबागांची लागवड करता येते. यापूर्वी राज्यात सुरु असलेले पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्यामुळे आता केवळ एमआरजीएस व पोकरातून फळझाडांची लागवड करता येते.  जिल्ह्यात २०२१-२०२२ या वर्षात आता पर्यंत ६०३ हेक्टरवर फळझाडांची लागवड केली आहे. यात ८८ हजार ९३२ फळरोपांचा समावेश आहे. यात सीताफळ २७ हजार, ७६०, पेरू २३ हजार ५९७, आंबा १३ हजार ३४३, मोसंबी १० हजार ९४४, कागदी लिंबू १० हजार ९४१, चिकू १५२०, चिंच ५१६, संत्रा २७७, शेवगा १८, जांभूळ १६ फळझाडे यांचा समावेश आहे.  अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार फळझाडे लावणार  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध प्रजातींची ७५ हजार फळरोपांची लागवड करण्यात येणार आहे. याची सुरवात जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्या हस्ते मागील वर्षी झाली. आगामी १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ७५ हजार फळझाडांची लागवड होणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT