Onion prices revised in Solapur
Onion prices revised in Solapur 
मुख्य बातम्या

सोलापुरात कांदा दरात पुन्हा सुधारणा 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवकेत पुन्हा एकदा चढ-उतार राहिला. पण मागणीमुळे कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज ५०० ते ६०० गाड्यांपर्यंत राहिली. गेल्या काही दिवसांपासून आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सप्ताहातही आवकेचे प्रमाण तुलनेने चांगले राहिले. पण गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात किंचित घसरण झाली होती. पण या सप्ताहात मागणीतील स्थिरतेमुळे पुन्हा दरात काहीशी सुधारणा झाली. कांद्याची आवक स्थानिकसह बाहेरील जिल्ह्रयातून झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय द्राक्ष, पेरु, मोसंबीची आवकही या सप्ताहात बऱ्यापैकी राहिली. त्यांना दरही तुलनेने चांगला मिळाला. द्राक्षाला प्रति चारकिलोच्या पेटीला किमान ८० रुपये, सरासरी १८० रुपये आणि सर्वाधिक २०० रुपये, पेरूला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर मोसंबीला किमान १५० रुपये, सरासरी २०० रुपये सर्वाधिक ४५० रुपये असा दर मिळाला.  लिंबू, काकडीलाही उठाव  गेल्या काही दिवसांपासून लिंबू आणि काकडीला चांगला उठाव मिळतो आहे. त्यांची आवक तुलनेने कमी राहिली. पण मागणी असल्याने दर टिकून आहेत. लिंबूची रोज २० ते ३० क्विंटल, कडीची १० ते १२ क्विंटल अशी आवक राहिली. लिंबूला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर काकडीला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Season : खरिपात तूर, कपाशी, हळद क्षेत्रवाढीचा अंदाज

Sludge Issue : गाळयुक्‍त खाडीमुळे चिरनेरवासी त्रस्‍त

Dam Water Stock : धरणांच्या पाणीपातळीत घट

Uttarakhand Forest Fire : सर्वोच्च न्यायालयाच्या कानउघडीनंतर थेट १० जणांचे निलंबन; ७ वननिरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

Agrowon Sanvad : चांगल्या कापूस उत्पादनासाठी एकात्मिक कीडनियंत्रण करावे

SCROLL FOR NEXT