Nashik: Drone spraying demonstration on onion crop in Sinnar taluka 
मुख्य बातम्या

नाशिक: सिन्नर तालुक्यात कांदा पिकावर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिके 

नाशिक: उत्कृष्टता कार्यक्रम व देवनदी फार्मर प्रोड्युसर कंपनी, लोणारवाडी (ता.सिन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन प्रात्यक्षिक चाचणी कांदा पिकावर घेण्यात आली.तालुक्यातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीम अॅग्रोवन

नाशिक: टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रूरल डेव्हलपमेंट सी-सेफ प्रकल्प अंतर्गत ‘शाश्वत शेती आणि उत्कृष्टता कार्यक्रम व देवनदी फार्मर प्रोड्युसर कंपनी, लोणारवाडी (ता.सिन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन प्रात्यक्षिक चाचणी कांदा पिकावर घेण्यात आली.तालुक्यातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सिन्नर तालुक्यातील भाटवाडी, लोणारवाडी, सरदवाडी, पास्ते, घोरवड आदी गावांमध्ये कांदा व इतर भाजीपाला पिकावर प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हा उपक्रम सी-सेफ प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना वापर व त्याचे फायदे समजण्यासाठी कांदा पिकावर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली. शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे घेऊन जाणे, त्यांना तांत्रिक मार्गदर्शनासह मूल्यसाखळी तयार करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्देश आहेत. त्याअनुषंगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. 

उपस्थित शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे फायदे शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकांमधून जाणून घेतले. यामध्ये भाजीपाला, मका, सोयाबीन, ऊस अशा पिकांची वाढ झाल्यानंतर फवारणी करण्यासाठी अडचणी शेतकऱ्यांना येतात. अशा परिस्थितीत वेळेवर फवारणी होत नसल्याने  नुकसान होते. मात्र या माध्यमातून नुकसान टाळता येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे, पिकावर त्यावर होणारे परिणाम याबाबत चाचण्या पुढील काळात घेणार आहोत. शेतकऱ्यांना पाठीवर पंप घेऊन शेतात फवारणी करताना समस्या जाणवतात. पाठीचा त्रास, औषध अंगावर पाठवर पडल्यानंतर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे कामात सुलभता येण्यासह वेळेची व श्रम बचत यामाध्यमातून होते, असे वीरेंद्र पवार यांनी सांगितले. 

यावेळी प्रत्यक्षिकास सी-सेफचे प्रमुख राकेश सनवाल, रॅलीजचे वरिष्ठ अधिकारी रणजित भंडारे, कौस्तुभ केळकर, सी-सेफचे मॅनेजर अजय तुरकणे, विरेंद्र पवार, राम जाधव व देवनदीचे अध्यक्ष  विठ्ठल खरजे, व्यवस्थापकीय संचालक अनिल शिंदे, संचालक अशोक महात्मे, भाटवाडीचे सरपंच  मनोज महात्मे, विकास महात्मे आदी उपस्थित होते.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Note Exchange: जिल्हा बँकांच्या नोटाबदलीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून

PM DhanDhanaya Yojana: ‘पीएम धनधान्य कृषी योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Maize Production: जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन?

Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT