Maize procurement center starts on Tuesday at Rs. 1870 per quintal 
मुख्य बातम्या

मंगळवेढ्यात मका खरेदी केंद्र सुरु, प्रतिक्विंटलला १८७० रुपयांचा दर 

सोलापूर ः मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशनंतर्गत जिल्हा मार्केटिंग विभाग यांच्या वतीने मंगळवेढ्यात खरेदी-विक्री संघात मका खरेदीसाठी नुकतेच हमीभाव केंद्राची सुरवात कऱण्यात आली.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशनंतर्गत जिल्हा मार्केटिंग विभाग यांच्या वतीने मंगळवेढ्यात खरेदी-विक्री संघात मका खरेदीसाठी नुकतेच हमीभाव केंद्राची सुरवात कऱण्यात आली.  सहायक निबंधक प्रमोद दुरगुडे यांच्या हस्ते आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी सचिन जाधव, विशाल जाधव,पोपट पडवळे, सत्यजित सुरवसे, पांडुरंग नकाते, दत्तात्रय कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष आवताडे म्हणाले, हमीभाव केंद्रे हे शेतकऱ्यांच्या फायद्याची आहेत. बाजारातील चढ-उताराचा कोणताही तोटा न होता, शेतकऱय़ांना योग्य ती किंमत मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मका, तूर यासारख्या २३ प्रकारच्या पिकांसाठी शासनाने ही योजना आणली आहे. दरवर्षी शेतकरी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. यंदाही ते देतील सध्या आपल्याकडे मका खरेदी केंद्र सुरु केले आहे. मक्याला प्रतिक्विंटलला हमीभावानुसार १८७० रुपये इतका दर आहे. बाजारातील दरापेक्षा निश्चितच तो अधिक आहे, असेही ते म्हणाले. केंद्रावर नावनोंदणी आणि विक्रीसाठी शंभु नागणे- (९४०५२१४५९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दरात सुधारणा; सोयाबीन स्थिरावले, हिरवी मिरची टिकून, वांगी आवक स्थिर तर मुगाचा भाव दबावातच

Cold Wave: धुळ्यात निचांकी ५.५ अंश तापमान; राज्यातील बहुतांशी भागात तापमानातील घट कायम

Farmers Issues: कॅनमधील डिझेल बंदीने शेतकरी अडचणीत

Farmer Development: शेतकऱ्यांच्या क्षमता विकासासाठी राज्याचे नवे धोरण

Horticulture Irrigation Supply: बागायती पिकांत सिंचनास वेग

SCROLL FOR NEXT