How to get to the farm near Samrudhi Highway? 
मुख्य बातम्या

सिन्नर, जि. नाशिक: समृद्धी महामार्गालगत शेतात जायचे कसे? 

सिन्नर, जि. नाशिक: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून या महामार्गासाठी संपादित केलेल्या जागेत संरक्षक भिंत उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाला दुशिंगपूर व कहांडळवाडी येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.

टीम अॅग्रोवन

सिन्नर, जि. नाशिक: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून या महामार्गासाठी संपादित केलेल्या जागेत संरक्षक भिंत उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाला दुशिंगपूर व कहांडळवाडी येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. महामार्गलगत असलेल्या शेतांमध्ये जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता हवा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी दुशिंगपूर पाझर तलाव क्षेत्रात ठेकेदाराची वाहने अडवत बुधवार (ता.१२) सकाळपासून आंदोलन सुरू केले. कार्यवाही होईपर्यंत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.  दुशिंगपूर येथील पाझर तलावाच्या मध्यातून समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. तलावात येणाऱ्या नाल्यावर असलेल्या पुलाखेरीज संपूर्ण क्षेत्रात मातीचा भराव घालून मार्गाची उंची वाढवण्यात आल्याने दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यातच मार्गाच्या दुतर्फा असलेल्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. महामार्गचे बांधकाम झाल्यानंतर ठेकेदाराकडून मार्गाच्या दोन्ही बाजूंनी दहा फूट उंचीची सिमेंटची भिंत उभारण्यात येत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनास आश्‍वासनाचा विसर पडल्याचे सांगत ठेकेदाराची वाहने अडवून भिंतीच्या बांधकामाला हरकत घेतली.  दत्ता पवार, अंकुश पवार, रामनाथ पवार, भास्कर कहांडळ, दत्तू कहांडळ, विलास कहांडळ, महेश गोराणे, आनंद गोराणे, नारायण गोराणे, यशवंत घेगडमल, सीताबाई मेहेरखांब, आण्णा कहांडळ, बाळू कहांडळ, गंगाधर कहांडळ आदी शेतकऱ्यांनी समृद्धीच्या दोन्ही बाजूंनी शेतीत जाण्या-येण्यासाठी कायमस्वरूपी रस्त्याची मागणी केली आहे.  दहा फुटी सर्व्हिस रोडचे काय?  समृद्धीच्या दोन्ही बाजूंनी शासनाने संपादित केलेल्या जागेत दहा फुटांचा सर्व्हिस रोड बनविण्यात येणार असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी सांगितले आहे. हा रस्ता झाला तर लगतच्या शेतकऱ्याच्या दळणवळणाचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. याबाबत कोणतीही कार्यवाही ठेकेदार अथवा प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू झालेली नाही. आता या रस्त्याबाबत प्रश्‍नचिन्ह असल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

Wheat Harvesting: पुणे विभागात गहू काढणीला वेग

Agriculture Department: तंत्र अधिकारी संवर्गात ठेवणे अन्यायकारक ठरेल

Talathi Bribery Case: लाचखोर तलाठ्याला सात वर्षांची सक्तमजुरी

Fruit Farming Workshop: सीताफळाचे भवितव्य ठरविण्यासाठी पुण्यात कार्यशाळा

SCROLL FOR NEXT