Extension of e-auction process of sand ghats in Akola 
मुख्य बातम्या

अकोल्यात वाळू घाटांच्या ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ 

अकोला ः महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित वाळू धोरण जाहीर झाले आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित वाळू धोरण जाहीर झाले आहे. सुधारित धोरणानुसार नवीन अर्जदारांना संधी मिळावी याकरिता जिल्ह्यातील ३० वाळू घाटांच्या ऑनलाइन ई-लिलाव प्रक्रियेला शनिवार (ता. पाच) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.  सुधारित वाळू धोरणाच्या तरतुदीनुसार वाळूचे स्वामित्वधन सहाशे रुपये प्रति ब्रासनुसार ठरविण्यात आले आहे. तसेच नवीन अर्जदारांना संधी मिळावी याकरिता ऑनलाइन ई-निविदाची मुदत वाढवून शुक्रवार (ता. चार) पर्यंत, तर ऑनलाइन ई-लिलाव शनिवारी (ता. पाच) घेण्यात येणार आहे. यापूर्वी जुना बाइंडिंग फार्म रद्द करून नवीन बाईंडिंग फॉर्म अपलोड करण्यात येणार आहे व त्यानुसार सन २०२१-२२ करिता जिल्ह्यातील ३० रेती घाटांकरिता ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT