Chimney of Siddheshwar factory Opposition to padkama by sugarcane workers 
मुख्य बातम्या

सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी  पाडकामाला ऊसतोड कामगारांचा विरोध 

सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा प्रशासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा ऊसतोडणी मजूर व वाहतूकदारांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिला आहे.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा प्रशासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा ऊसतोडणी मजूर व वाहतूकदारांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिला आहे. 

ऊसतोड मजूर व वाहतूकदार संघटनेने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटून यासंबंधी निवेदन दिले. कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासद, कामगार, मजूर, वाहतूकदार यांच्यासह प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस कारखान्यापर्यंत नेण्यासाठी कारखान्याने ९०० हून अधिक ट्रॅक्टर व ट्रकचालकांशी करार केला आहे. कारखान्याकडून अनामत रक्कम घेऊन ऊसतोडणी मजुरांना २२ कोटी रुपयांचे वाटप केले आहे, अशा परिस्थितीत कारखान्याची चिमणी पाडल्यास कारखाना बंद पडून ऊसतोड वाहतूकधारक आर्थिक अडचणीत येतील. ऊसतोड मजूर गावी परतल्यास त्यांना आगाऊ दिलेली रक्कम वसूल होणार नाही. तरी सर्व वाहतूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान टाळावे, यासाठी ही कारवाई थांबवावी, असेही त्यात म्हटले आहे. या वेळी म्हांतेश हत्तुरे, शिवराया बिराजदार, अशोक बिराजदार, लक्ष्मण झळकी, रामगोंडा बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, सुरेश बिराजदार, संगमेश मैंदर्गी उपस्थित होते.  नुकसानभरपाई द्या, अन्यथा हंगामानंतर पाडा  दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये वाहतूक व्यवसाय ठप्प राहिल्याने बँकांकडून घेतलेल्या कर्जांची परतफेडही करता आली नाही. अशा अडचणीच्या काळात चिमणीचे पाडकाम केल्यास वाहतूकदारांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. चिमणी पाडण्यासाठी कारखाना बंद करण्याअगोदर ऊसतोड मजूर व वाहतूकदारांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा, गाळप संपेपर्यंत चिमणीचे पाडकाम करू नये, अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT