55% sludge in Hatnur project 
मुख्य बातम्या

जळगाव ः हतनूर प्रकल्पात ५५ टक्क्यांवर गाळ 

जळगाव ः जिल्ह्यात तापी नदीवरील हतनूर (ता.भुसावळ) प्रकल्पात निम्मा गाळ आणि निम्मे पाणी, अशी स्थिती आहे. या प्रकल्पातील जलसाठा मार्चमध्येच संपण्याची स्थिती दरवर्षी तयार होत आहे. सुमारे आठ टीएमसी एवढी या प्रकल्पाची साठवण क्षमता आहे. या प्रकल्पाची निर्मिती सुमारे ४० वर्षांपूर्वी झाली होती.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः  जिल्ह्यात तापी नदीवरील हतनूर (ता.भुसावळ) प्रकल्पात निम्मा गाळ आणि निम्मे पाणी, अशी स्थिती आहे. या प्रकल्पातील जलसाठा मार्चमध्येच संपण्याची स्थिती दरवर्षी तयार होत आहे. सुमारे आठ टीएमसी एवढी या प्रकल्पाची साठवण क्षमता आहे. या प्रकल्पाची निर्मिती सुमारे ४० वर्षांपूर्वी झाली होती. तापी, पूर्णा व इतर उपनद्यांचे पाणी या प्रकल्पात येते. पूर्णा नदीतून अधिकचा गाळ येतो. या प्रकल्पातून दीपनगर (ता. भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, भुसावळ शहर, भुसावळ येथील आयुध निर्माणी यासह रावेर, यावल व चोपडा तालुक्यांतील शेतीला कालव्याद्वारे पाणी दिले जाते. या प्रकल्पावर अनेकांचे जीवन अवलंबून आहे. पण यात हळूहळू गाळ साचत गेला. 

गाळ वाढल्याने आता जलसाठा अल्प राहतो. दरवर्षी १०० टक्के हा प्रकल्प भरतो. परंतु त्यातील पाणी मार्चअखेरीस तळ गाठते. यामुळे या प्रकल्पातील गाळाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. गाळ काढण्याची आवश्यकता असून, त्यासाठी प्रशासन, पाटबंधारे विभागाने कार्यवाही हाती घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात तापी नदीवर एकच प्रकल्प आहे. त्यातही गाळाची समस्या वाढल्याने पुढे शेतीला पाणी कसे मिळणार, असा मुद्दा आहे. रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पाच्या पाण्याने भिजते. पुढे शहरांना पाणीपुरवठा करायचा की शेतीला, असा मुद्दाही उपस्थित होणार आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT