Monsoon Agrowon
मुख्य बातम्या

Monsoon Back : राज्यातील १५ जिल्ह्यांना आज 'येलो अलर्ट'; मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरणार

Monsoon Rain Return : हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला. राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Monsoon Return Journey : राज्यात शनिवार आणि रविवारी बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीनं हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला. राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुर, सोलापूर जिल्ह्यात सह सातारा, सांगली तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, तसेच विदर्भातील भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजा आणि ढगांच्या गडगडटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होईल. तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. पुढील दोन दिवसांत पश्‍चिम आणि मध्य भारताच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या आणखी काही भाग, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्लीसह, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानंतर मात्र मागील दोन दिवस मॉन्सून परतीच्या प्रवासाची स्थिती जैसे थे आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Moneylender Loan: शेतकऱ्यांची लूट; सावकारी कर्जात ४०० कोटींची वाढ; सहकारमंत्र्यांची विधानसभेत कबुली

Soil Fertility Management: उसाच्या जोमदार वाढीसाठी पूर्वमशागत महत्त्वाची

Orange Orchard Management: बदलत्या हवामानात मृग बहराचे शास्त्रीय नियोजन

Interview With Manikrao Khule: राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

Union Minister Farm Subsidy: केंद्रीय मंत्र्यांनेच लुटले ९९ लाखांचे अनुदान; काँग्रेसचा आरोप, भाजपचा बचाव

SCROLL FOR NEXT