tur rate agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : आयातीमुळे तूर खरंच दबावात येईल का ?

देशात सध्या तुरीचा पुरवठा कमी असल्याने दरात तेजी आली आहे. मात्र सरकार मोठी आयात करून पुरवठ्यातील तूट भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.

अनिल जाधव

पुणेः देशात सध्या तुरीचा पुरवठा (Tur Supply) कमी असल्याने दरात तेजी आली आहे. मात्र सरकार मोठी आयात (Tur Import) करून पुरवठ्यातील तूट भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देशातील तुरीचे दर (Tur Rate) काहीसे दबावात येतील, असा अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत. मात्र जाणकार आणि अभ्यासकांच्या मते तुरीचा पुरवठा कमीच राहून दरही तेजीतच राहतील.

देशात यंदा तुरीचा तुटवडा निर्माण झाला. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर तेजीत आहेत. त्यातच यंदा देशातील तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यंदा देशात तुरीची लागवड कमी झाली. तसेच पावसाने पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे यंदा तूर उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहणार आहे. परिणामी पुढील वर्षभर तूर पुरणार नाही. त्यामुळे सरकार तूर आयातीवर भर देत आहे.

सरकारने आफ्रिका आणि म्यानमारमधून तूर आयात वाढविण्याचा निर्णय घेतला. सरकार यंदाही जास्त तूर आयात करणार आहे. त्यामुळे देशातील तूर बाजारावर दबाव येईल, अशी चर्चा सुरु आहे. मात्र जाणकारांच्या मते यंदा देशातील तूर उत्पादन कमी असेल. मागील हंगामात देशात ४३ लाख टनांपेक्षा जास्त तूर हाती आली होती. तर आयात ८ लाख ६० हजार टनांवर पोचली. तर देशाचा वार्षिक वापर ४४ लाख टनांचा आहे. त्यामुळे तुरीचा अतिरिक्त पुरवठा झाला होता.

मात्र यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाजार अभ्यासकांच्या मते देशातील तूर उत्पादन यंदा २५ ते २७ लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल. तर उद्योगाच्या मते उत्पादन ३० ते ३२ लाख टनांच्या राहू शकते. उद्योगाचा अंदाज गृहित धरला तरी आयातीसह तुरीचा पुरवठा मागणीपेक्षा कमीच राहील. अभ्यासकांचा आकडा खरा मानला तर पुरवठा खूपच कमी राहील.

देशात तुरीचे नेमके किती उत्पादन होईल, हे आत्ताच सांगता येणार नाही. डिसेंबरपासून नवी तूर बाजारात येईल. त्यावेळी अंदाज येऊ शकतो. पण जाणकार आत्तापासूनच पुरवठा कमी राहील, असा अंदाज व्यक्त करत आहेत. त्यामुळे सध्या तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळत आहे. हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Pest Control: तुरीवरील पाने गुंडाळणाऱ्या अळीची कशी ओळखाल?

E-Praman Portal : ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइन

Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा

Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार

Vegetable Market : फळ-भाजीपाला बाजार सुरू करून उत्पन्नवाढीवर भर

SCROLL FOR NEXT