Wheat Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

भारत बांगलादेशला गहू निर्यात करणार का?

शेजारील बांगलादेशने भारताला गव्हाचा पुरवठा करण्यासाठी विनंती केल्याची चर्चा सुरू आहे.

टीम ॲग्रोवन

भारतीय गव्हाला जागतिक स्तरावर मागणी वाढत आहे. निर्यातबंदी (Wheat Export Ban) पूर्वी भारतीय गव्हाला चांगला दर मिळत होता. कारण रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine) यांच्यातील संघर्षामुळे जगभर गव्हाची टंचाई निर्माण झालेली आहे. ही दोनही देश जगभरात एकूण गव्हापैकी ३० टक्के गव्हाचा पुरवठा करतात. मात्र या दोन देशातील संघर्षामुळे जागतिक बाजारात गव्हाचा पुरवठा कमी झाला आहे

भारताने गहू निर्यातबंदी केल्यापासून देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाच्या किमतीवर परिणाम झाल्याचे दिसते. अलीकडेच शेजारील बांगलादेशने भारताला गव्हाचा पुरवठा करण्यासाठी विनंती केल्याची चर्चा सुरू आहे. इजिप्तबरोबर बांगलादेश हा देखील गव्हाचा मोठा आयातदार देश आहे.

मागच्या आठवड्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ‘वर्ल्ड एकॉनॉमी फोरम’मध्ये बोलताना ज्या देशांना गव्हाची गरज आहे अशा देशांना मदत करण्यासाठी संमती दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर बांगलादेशने भारताला गहू पाठवण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बांगलादेशने गेल्यावर्षी १.२ दशलक्ष गहू खरेदी केला होता. यंदा मात्र त्यात विक्रमी वाढ करत ४ दशलक्ष टन गहू बांगलादेशने भारताकडून खरेदी केला.

बांगलादेशसोबतच अजून सहा ते सात देश १.५ दशलक्ष टन गव्हाची मागणी करत असल्याची चर्चा जाणकार करत आहेत. गव्हाच्या टंचाईवर मार्ग शोधण्यासाठी सहा ते सात देश भारताला विनंती करत आहेत. यामध्ये आशियाई देशांचा समावेश आहे. बांगलादेश भारताचा नियमित गहू खरेदीदार आहे. बांगलादेशला गव्हाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. कदाचित एकट्या भारताकडून बांगलादेशची गव्हाची गरज भागणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT