Wheat Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat Market Rate : खानदेशात गहू दरात सुधारणा

खानदेशात गव्हाच्या दरात एक क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची सुधारणा झाली असून, कमाल दर २४९१ रुपयांपर्यंत पोचले आहेत.

Team Agrowon

Wheat Market Update जळगाव ः खानदेशात गव्हाच्या दरात (Wheat Rate) एक क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची सुधारणा झाली असून, कमाल दर २४९१ रुपयांपर्यंत पोचले आहेत. आवक घटत आहे.

गव्हाची पेरणी (Wheat Sowing) अपेक्षेपेक्षा कमी होती. खानदेशात ३० हजार हेक्टरवर गहू पेरणीची अपेक्षा होती. परंतु पेरणी सुमारे २८ हजार हेक्टरवर झाली होती. कापूस पिकात नुकसान दिसत असल्याने अनेकांनी कापूस पीक काढून डिसेंबरअखेर गहू पेरणी केली.

यामुळे क्षेत्र २८ हजार हेक्टरवर पोचले. परंतु उत्पादन हवे तेवढे नाही. उत्पादन प्रतिएकर ११ ते १२ क्विंटल, असे येत आहे. यातच ४ ते ७ मार्च व त्यानंतर ९ ते १७ मार्च यादरम्यान झालेल्या पाऊस, वादळाने गहू पिकाचीदेखील हानी झाली आहे.

मळणी लांबली होती. मळणी पूर्ण होत आली आहे. परंतु उत्पादन कमी असल्याने आवकही घटली आहे. आवक मार्चअखेर वाढते, पण यंदा आवक मार्चअखेरही वाढलेली नाही. यामुळे दरात सुधारणा झाली आहे.

मार्चच्या मध्यात गव्हास प्रतिक्विंटल २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर व जळगाव आणि धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा बाजार समितीतही दर मार्चच्या मध्यापर्यंत कमीच होते.

त्यात मागील तीन ते चार दिवसांत सुधारणा झाली आहे. सोमवारी (ता.२७) चोपडा व अमळनेर बाजार समितीत मिळून १८०० क्विंटल गव्हाची आवक झाली.

‘लोकवन’ची आवक घटणार

जळगाव बाजार समितीतही सोमवारी सुमारे २०० क्विंटल गव्हाची आवक झाली. चोपडा येथे किमान २००० कमाल २४९१ व सरासरी २३१५ रुपये, अमळनेर येथे किमान २१८१ व कमाल २४५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

जळगाव येथेही कमाल दर २५०० रुपये प्रतिक्विंटल, असाच होता. लोकवन प्रकारच्या गव्हास हे दर मिळत आहेत. गव्हाची आवक मागील पंधरवड्यात बऱ्यापैकी होती. ती मागील तीन ते चार दिवसांत कमी झाली आहे. पुढे ही आवक आणखी कमी होईल, असे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT