Wheat Production
Wheat Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat Production : राज्यात बारा लाख हेक्टरवर गहू उत्पादन

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Wheat Market News नगर ः राज्यात यंदाही गव्हाच्या पेरणी (Wheat Sowing) क्षेत्राने सरासरी ओलांडली आहे. यंदा राज्यात १२ लाख ८ हजार ८५० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड लाख हेक्टरने तर सरासरीच्या तुलनेत जवळपास सव्वा लाख हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता गव्हाच्या वाढत्या क्षेत्राचा (Wheat Acreage) आलेख कायम आहे.

राज्यात रब्बी पेरणीचे सरासरी ५४ लाख २९ हजार १०१ सरासरी क्षेत्र आहे. यंदा रब्बीची ५९ लाख ८८ हजार ३१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी ५६ लाख ८६ हजार १२१ हेक्टरवर पेरणी झाली होती.

म्हणजे यंदा राज्यात सरासरीपेक्षा साडेपाच लाख हेक्टरने, तर गतवर्षीपेक्षा तीन लाख हेक्टरने रब्बीचे पेरणी क्षेत्र वाढले आहे.

राज्यात रब्बीमधील गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख ८५ हजार ०१२ हेक्टर आहे. यंदा १२ लाख ८ हजार ८५० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा पंधरा टक्के क्षेत्र वाढले आहे. गेल्या वर्षी १० लाख ५९ हजार ९७३ हेक्टरवर पेरणी झाली होती.

गेल्या पाच वर्षांचा विचार करता २०१६-१७ मध्ये १२ लाख ७२ हजार हेक्टर २०१७-१८ मध्ये ११ लाख ३८ हजार हेक्टर, २०१८-१९ मध्ये ८ लाख ३४ हजार हेक्टर, २०१९-२० मध्ये १० लाख ५६ हजार, २०२०-२१ मध्ये ११ लाख २६ हजार हेक्टरवर व २०२१-२२ मध्‍ये ११ लाख ३२ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. राज्यात सर्वाधिक गव्हाचे क्षेत्र नगर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, बुलडाणा जिल्ह्यात आहे.

जिल्हानिहाय पेरणी (हेक्टर)

नाशिक ः ७१,५७७

धुळे ः ४४,०८३

नंदुरबार ः २३,३८२

जळगाव ः ५१,४१४

नगर ः १,३६,७९३

पुणे ः ४३,६३७

सोलापूर ः ६३,४११

सातारा ः ४२,७३३

सांगली ः १८,५९८,

कोल्हापूर ः १,६५२

औरंगाबाद ः ८६,५६१

जालना ः ७९,२२०

बीड ः ५२,२६४

लातूर ः १३,१२०

उस्मानाबाद ः३२,३३७

नांदेड ः ४१,६९३

परभणी ः ३३,१२६

हिंगोली ः ३२,२३७

बुलडाणा ः ६७,०६३

अकोला ः २०,४४६

वाशीम ः ३४,००८

अमरावती ः ४१,२४३

यवतमाळ ः ३८,७४४

वर्धा ः ३३,४०९

नागपूर ः ८८,४३५

भंडारा ः १०,७०५

गोंदिया ः १,३९८

चंद्रपूर ः १६,३३६

गडचिरोली ः २७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT