Rate stable for soybeans 
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market Rate : सोयाबीन बाजाराची स्थिती काय?

आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारात सध्या दर एका भावपातळीभोवती फिरत आहेत. पामतेलाच्या दरात सुधारणा झाल्यानं सोयाबीन तेलाच्याही दराला आधार मिळून सुधारणा झाली.

टीम ॲग्रोवन

पुणेः देशात पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणातही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या (Soybean Harvesting) कामाला गती दिली. तसंच उन्हामुळं सोयाबीनमधील ओलावाही (Soybean Moisture) कमी होण्यास मदत होत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात (Global Soybean Market) चढ-उतार सुरु आहेत. त्याचाही परिणाम देशातील सोयाबीन दरावर (Soybean Rate) होत आहे.

आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारात सध्या दर एका भावपातळीभोवती फिरत आहेत. पामतेलाच्या दरात सुधारणा झाल्यानं सोयाबीन तेलाच्याही दराला आधार मिळून सुधारणा झाली. शुक्रवारी सोयाबीन तेलाचे दर ७१.४७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. ते ७० सेंटपर्यंत कमी झाले. मात्र सोयाबीन तेलाला मागणीचा आधार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन १३ ते १४ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान विकलं जातंय. शुक्रवारी सोयाबीननं १३.९७ डाॅलरचा टप्पा गाठला होता. मात्र आज दर पुन्हा १३.८० डाॅलरपर्यंत खाली आले होते. तिकडं जगातील सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीममध्ये ५ हजार ५७५ युआन प्रतिटनानं सोयाबीनचे व्यवहार झाले.

देशात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. ऊनही वाढलं आहे. त्यामुळे ओलं झालेलं सोयाबीन वाळत आहे. त्यामुळं मागील १५ ते २० दिवसांनंतर सोयाबीन काढणीसाठी वातावरण चांगलं झालं. शेतात वाफसा आल्यानं दिवाळीच्या सणातही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला प्राधान्य दिल्याचं दिसतं.

दिवाळी आणि रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी सोयाबीन विकताना दिसत आहेत. मात्र आवक होणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावा अधिक आहे. परिणामी दर दबावात आहेत. दिवाळीमुळं राज्यातील अनेक बाजार समित्या पुढील काही दिवस बंद असतील. पण सध्या बाजारात जास्त ओलावा असलेल्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर जूनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयानं विकलं जातयं.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाचे दर वाढल्याचा आधार सोयाबीनला मिळतोय. तेलाचे दर आणखी वाढल्यास सोयाबीनचेही दर सुधारु शकतात. सध्याची बाजारातील स्थिती बघता सोयाबीनला किमान ५ हजार तर कमाल ५ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Processing Industry: अचलपुरातील कापूस प्रक्रिया उद्योगाची चाके थांबलेलीच!

Illegal Sand Mining: अवैध वाळू उत्खननावर ‘महसूल’ची धडक कारवाई

Uddhav Thackeray: शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

Urea Seizure: युरियाची विनापरवाना वाहतूक प्रकरणी पाथरी येथे गुन्हा दाखल

MahaVistar App: पंधरा हजारांवर शेतकऱ्यांकडून ‘महाविस्तार’ ॲपवर नोंदणी

SCROLL FOR NEXT