Dairy Industry: दुधातील भेसळ रोखण्यासाठी देशातील सर्व दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना सरकारी यंत्रणेकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतची सूचना देणारे परिपत्रक भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया - एफएसएसएआय) नुकतेच जारी केले आहे..‘एफएसएसएआय’च्या नियमन पूर्तता विभागाचे कार्यकारी संचालक डॉ. सत्येन कुमार पंडा यांनी ११ मार्च २०२६ रोजी हे परिपत्रक जारी केले. ‘सहकारी संस्थांचे सदस्य नसलेले काही दूध उत्पादक आणि दूध विक्रेते अन्न व्यवसायविषयक परवाना न घेता किंवा विनानोंदणी व्यवसाय करीत आहेत..FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची.त्यांना आता नव्याने व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी किंवा सुरू असलेला व्यवसाय कायम ठेवण्यासाठी ‘एफएसएसएआय’कडे नोंदणी अनिवार्य आहे,’ असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदणीकृत असलेल्या सहकारी दूध संस्थांचे सदस्य असलेले दूध उत्पादक तसेच या संस्थांना स्वतःचे पूर्ण दूधपुरवठा किंवा विक्री करणारे उत्पादक यांना या नोंदणी प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दूध भेसळीच्या संशयास्पद घटना होत असल्याचे निरीक्षण ‘एफएसएसएआय’ने नोंदविले आहे..Gokul Milk Union: चोख कारभार केल्यामुळे गोकुळ दुध संघाची प्रगती. ‘दूध भेसळीच्या संशयास्पद घटनांच्या पार्श्वभूमीवर आता नोंदणी किंवा परवाना अटींचे काटेकोर पालन केले जावे. याबाबत संबंधित सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सर्व दूध उत्पादक आणि दूध विक्रेत्यांकडील नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवान्याची पडताळणी करण्याचे आदेश द्यावेत. दुधाची गुणवत्ता राखण्यासाठी, तसेच जनतेचे आरोग्य जपण्यासाठी दुग्ध शीतपेट्यांची (मिल्क चिलर्स) वेळोवेळी तपासणी करावी, तसेच नियमभंग करणाऱ्या घटकांच्या विरोधात कारवाई करावी,’ असे स्पष्ट निर्देश ‘एफएसएसएआय’ने दिले आहेत..भेसळखोरांविरुद्ध विशेष मोहीम उघडा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता राखण्यासाठी विशेष अंमलबजावणी मोहीम उघडा, अशा मोहिमा नियमितपणे चालू ठेवा, तसेच दिलेल्या सूचनांसंदर्भातील कृती अहवाल दर पंधरवड्याला म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या १५ आणि ३० किंवा ३१ तारखेपर्यंत प्राधिकरणाकडे न चुकता सादर करा, अशा सूचना ‘एफएसएसएआय’ने दिल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.