Watermelon Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Khandesh Watermelon Market: खानदेशात कलिंगडाची आवक कमी; दरात सुधारणा

Watermelon Rate : मागील काही दिवसांत दरांमध्ये वाढ झाली असून, प्रतिकिलो ९ ते ११ रुपये मिळत आहेत. रमजान महिन्यामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारसह इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात कलिंडाच्या दरात मागील काही दिवसांत सुधारणा झाली असून, दर सध्या ९ ते ११ रुपये प्रतिकिलो, असे जागेवर किंवा थेट शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहेत.

सध्या कलिंगडाची प्रति दिन १५ ते १८ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आवक खानदेशात होत आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ही आवक फारशी अधिक नाही. कारण डिसेंबरमधील पाऊस, गारपीट व अन्य समस्यांमुळे कलिंगड पिकाची हानी खानदेशात सर्वत्र झाली आहे. यंदा खानदेशात सुमारे सात हजार हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली आहे. मागील हंगामात सुमारे तीन हजार हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा लागवड वाढली. पण उत्पादनातही घट येत आहे. एकरी फक्त १२ ते १३ टन उत्पादन येत आहे. काहींना यापेक्षा कमी उत्पादन येत आहे.

फळे कमी लगडली त्यात नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीमध्ये सतत विषम वातावरण तयार होत राहिले. डिसेंबरमध्ये पाऊस झाला. यानंतर फेब्रुवारीत उष्णता वाढली. यामुळे चोपडा, पारोळा भागातील कलिंगडाची मोठी हानी झाली. यामुळेदेखील उत्पादनाला फटका बसला आहे.

थंडीच्या कालावधीत किंवा १ ते ७ डिसेंबर या कालावधीत लागवड केलेल्या कलिंगडात हवे तसे उत्पादन आलेले नाही. तसेच या कालावधीत लागवड केलेल्या पिकाचे उत्पादन लांबणीवरही पडले आहे. ९४ ते १०० दिवस पूर्ण होऊनही उत्पादन हवे तसे नाही. यात शेतकऱ्यांचा खर्च वाढला. तसेच सिंचनाचे नियोजनही कोलमडले. जेवढे दिवस उत्पादन हाती येण्यास अतिरिक्त किंवा जादा लागले तेवढ्या दिवसांचा विद्राव्य खतांचा खर्च वाढला.

एक अधिकची फवारणीदेखील घ्यावी लागली. यामुळे कलिंगडाची खानदेशात लागवड अधिक असूूनही आवक कमी असून, दरांमधील चढउतारही सुरू आहे. दर मागील पंधरवड्यात नऊ ते १० रुपये प्रति किलो असे सरासरी होते. त्यात तीन-चार दिवसांत सुधारणा झाली. दर नऊ, १० ते ११ रुपये प्रतिकिलो, असे थेट शिवार खरेदीत मिळत आहेत.

कलिंगडाला उत्तरेकडे उठाव

कलिंगड दरात खानदेशात मागील तीन दिवसांत वाढ झाली आहे. जागेवर प्रति किलो साडेसात ते आठ रुपये दर तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना मिळाले. परंतु मागील दोन दिवसांपासून जागेवर नऊ ते ११ रुपये प्रति किलोचे दर मिळत आहेत. कलिंगडाची प्रतिकूल वातावरणात हानी झाली आहे. यामुळे दर्जेदार कलिंगडास उठाव आहे. रमझान महिन्यानिमित्त उत्तरेकडे कलिंगडास मागणी असून, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आदी भागांतील खरेदीदार कलिंगड खरेदीसाठी नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामुळे कलिंगड दरवाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune MTI Journey: ‘एमटीआय’ची आठ दशकी दमदार वाटचाल

Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

SCROLL FOR NEXT