Urea Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Urea Shortage: तेलंगणात युरिया संकट; केंद्राकडून कमी पुरवठा होत असल्याचा दावा

Telangana Fertilizer Crisis: खरिपातील पीके खत देण्याच्या टप्प्यावर आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी वाढली. तेलंगणात मात्र युरियाची टंचाई भासत आहे.

Anil Jadhao 

Pune News: खरिपातील पीके खत देण्याच्या टप्प्यावर आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी वाढली. तेलंगणात मात्र युरियाची टंचाई भासत आहे. केंद्राने युरियाचा कमी पुरवठा केला आहे. केंद्राकडून पुरेसा युरियाचा साठा मिळाला नाही तर पुढील ३ महिन्यांमध्ये पिकांना आवश्यक वेळी खते देता येणार नाहीत, असे तेलंगणाचे कृषिमंत्री तुम्माला नागेश्वरा राव यांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जी. पी. नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

कृषिमंत्री राव यांनी पत्रात म्हटले की, “केंद्राने एप्रिल,मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये तेलंगणा राज्याला ५ लाख टन युरिया देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तेलंगणाला आतापर्यंत केवळ ३ लाख टनच युरिया मिळाला. राज्यात २ लाख टन युरिया कमी पुरवठा झाला. त्यामुळे टंचाई भासत आहे. शेतकऱ्यांची युरियाला मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांना वेळेत युरिया देण्यासाठी केंद्राने वेळेत युरियाचा पुरवठा करावा.”

युरियाच्या मागणीपेक्षा पुरवठा खूपच कमी असल्याने तेलंगणात युरिया टंचाईची स्थिती भीषण होत असल्याचे निदर्शनास आणून देत राव यांनी केंद्राच्या नियोजनावर टिका केली. “जुलै महिन्यात केंद्रीय खते विभागाने तेलंगणाला १ लाख ६० हजार टन खतांचे आवंटन केले. त्यापैकी ६० टक्के युरिया आयातीच्या माध्यामातून असणार आहे. पण कोणत्या व्हेसल्समधून हा आयात युरिया मिळणार? हे मात्र सांगितले नाही. आयात युरिया कधी येणार आणि कधी मिळणार? याची माहिती देण्यात आली नाही. हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे.”

देशात उत्पादीत युरिया द्या

केंद्राने आयात युरिया ६० टक्के देऊ केला. पण त्याचा काही भरवसा नाही. त्यामुळे केंद्राने देशात उत्पादीत युरिया तेलंगणाला द्यावा. विशेषतः रामागुंडम प्लांडमधून आवंटन केलेल्या ३० हजार ८०० टनांऐवजी ६० हजार टन युरिया द्यावा. असे केल्यास तेलंगणातील शेतकऱ्यांना वेळेत युरिया उपलब्ध होईल. तसेच एप्रिल ते जूनच्या दरम्यान मागणीच्या तुलनेत २ लाख टन युरिया कमी दिलेला आहे. हा युरिया देखील राज्याताल तातडीने द्यावा, अशी मागणी कृषिमंत्री राव यांनी केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT