Urea Shortage : युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त

Fertilizer Demand : हंगाम सुरू होताच यंदाही युरियाची समस्या तयार झाली. नॅनो युरिया उपलब्ध आहे, परंतु अनेक जण पेरणी करतानाच दाणेदार युरियाचा वापर करतात.
Urea Shortage
Urea ShortageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात युरिया पुरेसा उपलब्ध आहे, त्याची माहिती आता शेतकरी आपल्या मोबाइलवर कृषी विभागाने विकसित केलेल्या ब्लॉगवर पाहू शकतात. पण दुसरीकडे विक्रेते शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन देऊन युरियाची कृत्रिम टंचाई दूर करण्याची मागणी केली आहे.

हंगाम सुरू होताच यंदाही युरियाची समस्या तयार झाली. नॅनो युरिया उपलब्ध आहे, परंतु अनेक जण पेरणी करतानाच दाणेदार युरियाचा वापर करतात. तसेच केळी, भाजीपाला पिकांसाठीही पाऊस आल्यानंतर युरियाची मागणी असते.

डीएपीची समस्याही आहे. त्यासाठी अन्य मिश्र खतांचा पर्याय आहे, पण ती खते डीएपीच्या तुलनेत महाग असल्याने डीएपीची मागणी आहे. नॅनो डीएपीचा पर्याय आहे. पण युरियाप्रणाणेच केळी, अन्य पिकांसाठी डीएपीची मागणी हंगामात आहे. यात युरियाचा पुरेसा साठा जिल्ह्यात आहे. पण अमळनेर, पारोळा, जामनेर आदी भागांत अनेक शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याची स्थिती आहे.

Urea Shortage
Fertilizer Shortage : डीएपी खताची टंचाई

यात अमळनेर शहरात युरियावर लिंकिंग सुरू आहे. युरिया पुरेसा मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. यानंतर अमळनेरात ११ कृषी केंद्रांची तपासणीदेखील करण्यात आली. पाऊसमान जेथे बरे आहे, तेथे मका, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी पिके असून, या पिकांसाठी शेतकरी युरिया, पोटॅशची मागणी करीत आहेत. पण युरिया नसल्याने अडचणी येत आहेत.

Urea Shortage
Fertilizer Shortage : सिंधुदुर्गातील खत तुटवड्याने शेतकरी हैराण

शेतकरी कृषी विभागाकडे तक्रारी घेऊन जातात. कृषी विभाग मात्र युरिया पुरेसा आहे, असे सांगत आहे. दुसरीकडे दुकानांवर युरिया नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासंबंधी अमळनेरात शेतकरी व महाविकास आघाडीने आंदोलन केले.

युरियावरील लिंकिंग बंद करा, शेतकऱ्यांची लूट थांबवा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांची उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे व तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी भेट घेतली.

या वेळी शेतकरी, नेत्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या वेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, किसान काँग्रेसचे सुरेश पाटील, विजय पाटील, संदीप घोरपडे, प्रताप पाटील, योजना पाटील, अशोक पवार आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com