Banana Seedling  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Seedling: हळद संशोधन केंद्राकडून एक लाखावर रोपांची विक्री

Hingoli Turmeric Research: मराठवाड्यातील शेतकरी कंदाऐवजी रोपांद्वारे हळद लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत, आणि त्यामुळे उत्पादनात वाढ, तण नियंत्रण व पीक खर्चात घट होत आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News: मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, जालना, विदर्भातील वाशीम या प्रमुख हळद उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी कंदाऐवजी (बेणे) रोपाद्वारे हळद लागवड करू लागले आहेत. त्यामुळे हळदीच्या रोपांना पसंती वाढली आहे. यंदा वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर हळदीच्या १ लाख ५ हजार रोपांची विक्री झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हळद संशोधन केंद्रातर्फे गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर ५० हजार हळदीची रोपे तयार करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे पीक व्यवस्थापनातील एक ते दीड महिन्याचा कालावधी कमी होतो.

सुरुवातीच्या काळातील तण व्यवस्थापन प्रभावीपणे व कमी खर्चात करता येते. उत्पादन देखील चांगले मिळत आहे. रोपाद्वारे संशोधन केंद्र तसेच विविध गावांमध्ये लागवड केलेल्या हळदीचे चांगले उत्पादन मिळत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे यंदा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, व्यवस्थापकीय संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदशनात तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या निगराणीत प्रक्षेत्रावर २ लाखांवर रोपे तयार करण्यात आली.

हळदीच्या सेलम या प्रचलित वाणासह फुले स्वरूपा, पीडीकेव्ही वायगाव, मेदूकर, एसबी १०८४३, रोमा, दुग्गीराला रेड, सुदर्शना आदी वाणांची रोपे तयार करण्यात आली. वातावरणात अनुकूल, कीड व रोगांना कमी बळी पडणारे, कमी, मध्यम व जास्त कालावधीचे, कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेले तसेच हळद पावडर निर्मितीसाठी उत्कृष्ट तसेच सेलम वाणाच्या तुलनेत अधिक सरस अशा काही वाणांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT