Turmeric Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : हिंगोलीत हळदीला प्रतिक्विंटल १०६०० ते १२३५० रुपयांचा दर

माणिक रासवे

Hingoli News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे या आठवड्यातील सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी असे तीन दिवस हळदीची आवक घेतली जाणार आहे.

असे बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी (ता. २०) हळदीची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०६०० ते कमाल १२३५० रुपये तर सरासरी ११४७५ रुपये दर मिळाले.

नवमीमुळे सोमवारी (ता. २३) हळदीची आवक बंद राहिली. संत नामदेव हळद मार्केटमध्ये शुक्रवारी हळदीची ६०० क्विंटल आवक झाली होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान १०६०० ते कमाल १२३५० रुपये तर सरासरी ११४७५ रुपये दर मिळाले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरुवारी (ता. १९) हळदीची ५५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०६०० ते कमाल १२६५० रुपये तर सरासरी ११६२५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १८) हळदीची ८०० क्विंटल आवक झाली.

त्यास प्रतिक्विंटल किमान १०००० ते कमाल १२००५ रुपये तर सरासरी ११००२ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १७) हळदीची ९०० क्विंटल आवक झाली होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान १०२०० ते कमाल १२१०० रुपये तर सरासरी १११५० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT