Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Rate: हिंगोलीत हळद दरात नरमाईच

Hingoli Market Update: कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये मागील महिनाभरापासून दरात फारशी सुधारणा नसून अद्याप नरमाईच आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News: हिंगोली जिल्ह्यात हळद लागवड सुरू झाली आहे. यंदा हळदीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये मागील महिनाभरापासून दरात फारशी सुधारणा नसून अद्याप नरमाईच आहे. सोमवारी (ता. १६) हळदीची १८२५ क्विंटल आवक होती. हळदीला प्रति क्विंटल किमान १०५०० ते कमाल १२९०० रुपये तर सरासरी ११७०० रुपये दर मिळाले. हळद दरात क्विंटलमागे १०० ते ४०० रुपयांनी घसरण झाली.

मंगळवारी (ता. १०) हळदीची २०२५ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान १०९५० ते कमाल १२९५० रुपये तर सरासरी ११९५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ११) हळदीची ११९० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान १०७०० ते कमाल १३२०० रुपये तर सरासरी ११९५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १२) हळदीची १९०० क्विंटल आवक असतांना प्रति क्विंटल किमान १०८६० ते कमाल १२८६० रुपये तर सरासरी ११८६० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. १३) हळदीची १८०० क्विंटल आवक होउन प्रति क्विंटल किमान १०९०० ते कमाल १३००० रुपये तर सरासरी ११९५० रुपये दर मिळाले. मे महिन्यात ता. १३ ते ता. १७ या कालावधीत हळदीची १८५० ते १९४० क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रति क्वंटल १०५०० ते १३७०० रुपये दर मिळाले होते.

सोयाबीनचे दर दबावतच

हिंगोली बाजार समितीच्या धान्य बाजारात सोमवारी (ता. १६) सोयाबीनची ४०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ३८०० ते कमाल ४३०० रुपये तर सरासरी ४०५० रुपये दर मिळाले. हरभऱ्याची २०० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ४९०० ते कमाल ५४०० रुपये तर सरासरी ५१५० रुपये दर मिळाले. ज्वारीची १९ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान १९०० ते कमाल २४०० रुपये, सरासरी २१५० रुपये दर मिळाले.

नवीन हळद लागवड सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत क्षेत्रात हिंगोली भागात दुप्पट वाढ झाली आहे. मागील महिनाभरपासून हळदीची फारशी सुधारणा झाली. सोमवारी (ता. १६) आवक कमी झाली. दर १०० ते ४०० रुपयांनी कमी झाले. जूनअखेर आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते.
नारायण पाटील, सचिव, कृऊबा. हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT