Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Production: देशात हळदीच्या क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढीचा अंदाज

Turmeric Market Update: देशात यंदाच्या हंगामात हळदीचे क्षेत्र २५ टक्क्यांनी वाढण्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशात हळदीचे क्षेत्र ३ लाख ६२ हजार ७६७ हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: गेल्या दोन वर्षांपासून हळदीला चांगले दर मिळत आहेत. तसेच देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशातही हळदीची मागणी वाढली आहे. हळदीचे दरही स्थिर आहेत. यामुळे देशात यंदाच्या हंगामात हळदीचे क्षेत्र २५ टक्क्यांनी वाढण्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशात हळदीचे क्षेत्र ३ लाख ६२ हजार ७६७ हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी हळदीचे दर दबावात होते. परिणामी हळदीच्या क्षेत्रात घट झाली होती. गत वर्षी २ लाख ९० हजार ९३९ हेक्टरवर लागवड झाली होती. दोन वर्षांच्या तुलनेत गत वर्षी १८९१ हेक्टरने क्षेत्र घटले होते. २०२३-२४ मध्ये महाराष्ट्रात ८५,१४८ हेक्टरवर लागवड झाली होती.

गत हंगामात राज्यात कमी पर्जन्यमान, वाढती उष्णता आणि लांबलेला पाऊस यामुळे राज्यात हळदीची लागवड लांबणीवर पडली होती. परिणामी गत वर्षी देशात ७ हजार १५४ हेक्टरने क्षेत्र कमी झाले होते. मात्र तेलंगण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत गत वर्षी हळदीचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे देशात हळदीच्या क्षेत्रात फारशी घट झाली नसल्याने उत्पादनात वाढ झाली.

गेल्या दोन वर्षांपासून हळदीला चांगले दर मिळत आहे. यामुळे देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यातील शेतकरी हळद लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, यंदा मे महिन्याच्या मध्यापासून पावसाला सुरुवात झाली. यामुळे हळद लागवड काही प्रमाणात लांबणीवर पडली होती. परंतु अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी हळद लागवड केली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, तेलंगण, निजामाबाद, एरोड, आंध्र प्रदेश, कडपा, दुग्गीराला या भागांत गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीच्या क्षेत्रात वाढ होईल.

मराठवाडा आणि विदर्भात हळदीचे क्षेत्र वाढल्यास राज्यातील क्षेत्रात पुन्हा वाढ होईल आणि हळद लागवडीत पुन्हा महाराष्ट्र अव्वल स्थानी असेल. गत वर्षी २ लाख ९० हजार ९३९ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा २५ टक्के म्हणजे ७२ हजार ३७४ हेक्टरने वाढून ३ लाख ६२ हजार ७६७ हेक्टरवर पोहोचेल असा अंदाजही व्यापारी आणि हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

हळदीवर करप्याचा प्रादुर्भाव

हळद पीक लागवड करून सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे. हळद पिकाचा शाखा वाढीचा कालावधी आहे. सध्या पावसाचा खंड असला तरी, हळद पिकावर फारसा परिणाम होणार नसल्याचे हळद संशोधन केंद्राने सांगितले आहे. विदर्भ, मराठवाडा या परिसरांत वातावरणातील बदलाने हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव या भागात दोन टक्क्यापर्यंत झाला असल्याचा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे.

यंदा हळद लागवड लांबणीवर पडली असली, तरी देशात हळदीचे क्षेत्र वाढले असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या हळद पिकास पोषक वातावरण असल्याने पीक परिस्थिती चांगली आहे.
डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबेडिग्रज, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion export India : कांद्याचे १५०, द्राक्षाचे ३०० कंटेनर अडकले; इराण आणि इस्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे निर्यात ठप्प, शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका

Gharkul Yojana: राज्यात एका वर्षात जवळपास ४ लाख घरकुले पूर्ण, हा आजपर्यंतचा विक्रम- जयकुमार गोरे

Poultry Farming: मुसळवाडीत कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद

Farm Loan Waiver: थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीबाबत कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Akot APMC: ‘एसआयटी’ चौकशीमुळे सहकार क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT