Parbhani News : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत (पिएसएस) खरिप हंगाम २०२४-२५ मधील तूर हमीभावाने (प्रतिक्विंटल ७५५० रुपये) विक्रीसाठी पणन महासंघ अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ३३ पैकी ३१ खरेदी केंद्रांवर २ हजार ८६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन केली आहे.
शुक्रवार (ता.२१) पर्यंत बोरी, सेलू, कनेरगाव, नागसिनगी या ४ केंद्रांवर २२ शेतकऱ्यांची २९६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली. परभणी जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १०.५० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून १० हजार २२५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय नोडल एजन्सी नाफेडच्या (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) वतीने हमीभावाने तूर खरेदी करिता राज्य सहकरी पणन महासंघ अंतर्गतच्या परभणी, पेडगाव, झरी, वरपुड, जिंतूर, बोरी, भोगाव, सेलू, मानवत, रुढीपाटी, पाथरी, देवनांदरा, सोनपेठ, पालम, चाटोरी, पूर्णा, एरंडेश्वर, ताडकळस या १८ पैकी १६ केंद्रावर ९३७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून १९२ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले. शुक्रवार (ता. २१) पर्यंत सेलू आणि बोरी या दोन केंद्रावर ९ शेतकऱ्यांनी ९२.५० क्विंटल विक्री केली. या तुरीची किंमत ६ लाख ९८ हजार ३७५ रुपये होते.
हिंगोली जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी ११.५० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून ८ हजार ८६५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) वतीने तूर खरेदी करिता राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा, पुसेगाव या १५ केंद्रांवर १ हजार १४९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून १ हजार ९९ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले.
शुक्रवार (ता. २१) पर्यंत कनेरगाव आणि नागसिनगी या २ केंद्रांवर १३ शेतकऱ्यांनी २०३.५० क्विंटल तूर विक्री केली. या तुरीची किंमत १५ लाख ३६ हजार ४२५ रुपये होते.
परभणी-हिंगोली जिल्हे हमीभावाने तूर विक्री
शेतकरी नोंदणी, खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
केंद्र शेतकरी नोंदणी तूर खरेदी शेतकरी संख्या
बोरी २४० ३९.५० ४
सेलू २७२ ५३.०० ५
परभणी ०० ०० ००
जिंतूर ४५ ०० ००
भोगाव ३४ ०० ००
मानवत ०३ ०० ००
पाथरी १६ ०० ००
पेडगाव ११६ ०० ००
वरपुड ०८ ०० ००
झरी ०० ०० ००
रुढीपाटी ७१ ०० ००
देवनांदरा ७९ ०० ००
सोनपेठ ३ ०० ००
पालम ०८ ०० ००
चाटोरी ०८ ०० ००
पूर्णा १२ ०० ००
एरंडेश्वर २१ ०० ००
ताडकळस ०१ ०० ००
कनेरगाव १०१ १६२ ०९
नागासिनगी ५० ४१.५० .०४
हिंगोली ३३१ ०० ००
फाळेगाव ५२६ ०० ००
कळमनुरी ३६ ०० ००
वारंगा ०२ ०० ००
वसमत ५ ०० ००
जवळाबाजार १२ ०० ००
सेनगाव ३३ ०० ००
साखरा २५ ०० ००
शिवणी खुर्द ०५ ०० ००
आडगाव ०७ ०० ००
उमरा ०२ ०० ००
पुसेगाव १२ ०० ००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.