Market Update  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : तुरीचे बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, मोसंबी तसेच काय आहेत आजचे कांदा दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मोसंबी, तूर आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये पुन्हा सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज सुधारणा दिसून आली. सोयाबीनसह सोयापेंडचे भावही वाढले होते. आज दुपारपर्यंत वायदे १०.५५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस स्थिरावला

कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीसे कमीच होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७३.६५ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे आज कमी होऊन ५८ हजार २३० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्यात चढ उतार

कांदा दरातील चढ उतार कायम आहे. कांद्याच्या भावात रोज ५० ते १०० रुपयांची तेजी मंदीज दिसून येत आहे. सरकारने स्टाॅकमधला कांदा विक्री सुरु केली. तसेच पंजाबमध्ये अफगाणिस्तानमधून कांदा दाखल होत आहे. हा कांदा नगण्य आहे. मात्र सरकार सध्या कांदा बाजारात मानसिक खेळी करत असल्याचे दिसते. त्यामुळे बाजारात सध्या कांद्याला ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याच्या भावातील चढ उातर कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीचा भाव स्थिरावला

तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता. तसेच आयातही सुरु आहे. याचा दबाव दरावर आला. पण भाव १० हजारांच्या दरम्यान राहीले होते. मात्र सणांची मागणी वाढल्याने तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. तुरीचा सरासरी भाव १० हजार ते १० हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.  

मोसंबीचे भाव नरमले

मोसंबीचा नवा हंगाम आता सुरु झाला. बाजारात नव्या मोसंबीचा माल सुरु झाला आहे. पण नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यातील मोसंबी पट्ट्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मोसंबी पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. गुणवत्ताही खालवली. यामुळे मोसंबीच्या भावावर दबाव आला. सध्या मोसंबीला ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मोसंबीची आवक पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने नुकसान झाल्याने गुवत्तापूर्ण मोसंबीला चांगले मार्केट राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT