Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Bonus: तुरीला ४५० रुपये बोनस अर्थसंकल्पात जाहीर करा: शेतकऱ्यांची मागणी

Farmers Demand: सरकारच्या आयात धोरणामुळे तुरीच्या किमती कोसळल्या असून, कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही क्विंटलला ४५० रुपये बोनस मिळावा, अशी मागणी केली जात आहे.

Anil Jadhao 

Pune News: सरकारच्या आयात धोरणामुळे तुरीचे भाव पडले आहेत. कर्नाटक सरकारने आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने खेरदीवर क्विंटलला ४५० रुपये बोनस जाहीर केला. त्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ४५० रुपये बोनस द्यावा. याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

देशात तूर उत्पादनात आघाडीवर असलेल्या कर्नाटकात तूर खरेदी सुरु होऊन महीना झाला. कर्नाटकात यंदा ३ लाख ६ हजार टन तूर खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे. कर्नाटक सरकारने खरेदीवर क्विंटलला ४५० रुपये बोनसही जाहीर केला आहे. म्हणजेच हमीभाव ७ हजार ५५० रुपये आणि त्यावर बोनस ४५० रुपये असा एकूण ८ हजार रुपये भाव कर्नाटकमधील तूर उत्पादकांना मिळणार आहे. त्यामुळे कर्नाटकमधील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल. 

महाराष्ट्रात मात्र सरकारने केवळ खेरदी जाहीर केली. महाराष्ट्रात २ लाख ९७ हजार टन खेरदी केली जाणार आहे. पण खरेदीत आधीच अनेक अडचणी आहेत. त्यातही केवळ हमीभावाने खेरदी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकप्रमाणे तुरीला बोनस जाहीर केला नाही. खरेतर बोनस जाहीर करताना कर्नाटक सरकारने म्हटले की, गेले वर्षभर तुरीच्या भावात तेजी होती. मात्र याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांना १० -१२ हजार तर नाही पण किमान सरासरी दर मिळावा यासाठी बोनस जाहीर केला. शेतकऱ्यांना किमान ८ हजार रुपये तरी मिळतील, अशी मानसिकत ठेवत कर्नाटक सरकारने बोनस जाहीर केला. हीच मानसिकता महाराष्ट्र सरकारने ठेवणे आवश्यक आहे. 

बाजारात नव्या तुरीची आवक वाढत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारांमध्ये आवकेचा दबाव येत आहे. तुरीची बाजारात आवक वाढत असली तरी सरकारची खरेदी मात्र राज्यात अजून वेग घेताना दिसत नाही. अनेक ठिकाणी केंद्रांवर आतापर्यंत केवळ नाव नोंदणीच सुरु आहे. प्रत्यक्ष खरेदी मात्र मोजक्याच ठिकाणी सुरु झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या खुल्या बाजारातच तूर विकावी लागत आहे. परिणाम बाजारात सध्या तुरीला सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. 

सरकारने तुरीची मुक्त आयात केल्याने देशात आयात वाढली. २०२३-२४ मध्ये जवळपास साडेसात लाख टन तुरीची आयात झाली होती. ती चालू आर्थिक वर्षात १२ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. या आयातीमुळेच तुरीचे भाव पडले आहेत. या आयातीचा दबाव देशातील बाजारावर आला. म्हणजेच सरकारचे धोरण भाव कोसळण्याला जबाबदार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तुरीला किमा ४५० रुपये बोनस जाहीर करावा. तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात बोनसची घोषणा करावी, अशी मागणी राज्यातील शेतकरी करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT