Tur Farming Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Cultivation Decline: तूर लागवड खानदेशात घटणार

Khandesh Market Update: २०२३-२४ मध्ये चांगला दर मिळाल्याने तूर लागवड वाढली होती. मात्र, यंदा दरात मोठी घसरण आणि नऊ महिन्यांचे उत्पादनकाल पाहता खानदेशातील शेतकरी तूर लागवडीपासून दूर राहत असल्याचे चित्र आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात तूर लागवड यंदा कमी होईल, असे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड निम्म्याने घटून सुमारे चार ते पाच हजार हेक्टरवर पेरा होईल, असे संकेत आहेत.

तूर पिकासाठी खानदेशातील काही भाग प्रसिद्ध आहे. २०२३ - २४ मध्ये तुरीला चांगला दर मिळाला. कमाल १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. यामुळे २०२४-२५ मध्ये तूर लागवड खानदेशात वाढली. जळगाव जिल्ह्यात या वर्षात ११ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली. खानदेशात एकूण तूर लागवड मागील हंगामात सुमारे १८ हजार हेक्टरवर झाली होती.

परंतु यंदा लागवड कमी होईल. कारण तूर दर या हंगामात पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल, एवढेच होते. तूर उत्पादन बऱ्यापैकी आले. पण दर कमी होते. शिवाय अनेकांनी बागायती तुरीची लागवड केली होती. सुमारे नऊ महिन्यांचे पीक होते. एवढा कालावधी क्षेत्र अडकले व दर कमी मिळाल्याने नुकसान झाले, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यामुळे बागायती तूर लागवड कमी होईल. खानदेशात बागायती तूर लागवड प्रघाताने जळगावातील मुक्ताईनगर, रावेर भागात केली जाते. तसेच नंदुरबारातील नवापूर, तळोदा भागातही तूर पीक असते. अनेक शेतकरी कापूस पिकात आंतरपीक म्हणून तूर उत्पादन घेतात.

यंदा तूर लागवड कमी होणार असल्याने बियाण्यासही कमी उठाव राहणार आहे. मागील वेळेस अधिक उत्पादनक्षम व प्रतिकूल स्थितीत तग धरणाऱ्या वाणांना उठाव होता. यंदा मात्र तूर लागवडीबाबत शेतकऱ्यांत उत्साह नाही. खानदेशात जूनमध्येच अनेक शेतकरी बागायती तुरीची लागवड ठिबकच्या मदतीने करतात. परंतु यंदा तूर लागवड करण्याबाबत नियोजन, तयारी दिसत नसल्याची स्थिती आहे.

यंदा १० ते ११ हजार हेक्टरवर लागवड

तुरीची लागवड खानदेशात यंदा १० ते ११ हजार हेक्टरवर होईल. त्यात जळगाव जिल्ह्यातील लागवड फक्त पाच हजार हेक्टरपर्यंत अपेक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT