Tur Arrivals
Tur Arrivals Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Arrival : खानदेशात तूर आवक वाढू लागली; दर स्थिर

Team Agrowon

जळगाव ः खानदेशातील बाजारांत तुरीची (Tur Arrival) आवक वाढत आहे. यंदा पीक बऱ्यापैकी होते. यामुळे उत्पादनही (Tur Production) काही भागांत चांगले आहे. तुरीला ६३०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर आहे. कमाल दर (Tur Rate) सात हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. (Tur Rate)

खानदेशात अमळनेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा या बाजार समित्यांत तुरीची आवक होत असते. मुक्ताईनगर, रावेरातील काही शेतकरी बुलडाणा जिल्ह्यातही तूर विक्रीसाठी जातात.

जळगावात सुमारे दीड हजार हेक्टरवर तूर लागवड (Tur Cultivation) झाली होती. तसेच अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकात आंतरपीक म्हणून तूर पीक घेतले आहे.

धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे एक हजार हेक्टरवर तूर पीक होते. तेथेही कमाल शेतकऱ्यांनी कापूस पिकात आंतरपीक म्हणून तूर लागवड केली होती. अनेक भागात मळणी सुरू आहे. तसेच काहींनी मळणी पूर्ण केली आहे.

अमळनेर (जि. जळगाव) येथील बाजारात तुरीची आवक अधिक आहे. तेथे किमान ६३०० व कमाल सात हजार रुपये प्रतिक्विंल या आठवड्यात तुरीला मिळाला आहे. तेथे प्रतिदिन सरासरी १०० क्विंटल तुरीची आवक झाली आहे.

जळगाव, चोपडा बाजारात मिळून प्रतिदिन ८० क्विंटल तुरीची आवक या आठवड्यात झाली आहे. धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथेही तुरीची प्रतिदिन सरासरी ६० क्विंटल आवक झाली आहे.

नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा येथेही प्रतिदिन सरासरी ५० क्विंटल आवक झाली आहे. कुठेही मोठी आवक नाही. दरही स्थिर आहेत. मध्यंतरी कमाल दर ६५०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. पण त्यात काहीशी वाढ झाली आहे. कारण आवक कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT