Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर व्यापाऱ्याची अरेरावी

Soybean Farmer : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याने पैसे वेळेवर दिलेच नाही, उलट अरेरावीची भाषा वापरून मुजोरी केली आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याने पैसे वेळेवर दिलेच नाही, उलट अरेरावीची भाषा वापरून मुजोरी केली आहे. त्यामुळे अडचणीत शेतकऱ्यांना मदत तर दूरच; मात्र काही व्यापारी अडवणूक करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

या बाबत शेतकऱ्यांतून संताप उमटल्यानंतर बाजार समितीने अखेर कारवाईचा पवित्रा घेत व्यापाऱ्याचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी, की निफाड उपबाजार आवारात सोमवारी (ता. २३) लिलावात शेतकऱ्याने सोयाबीन विक्री केली.

त्यावर शेतकऱ्याने धान्य व्यापारी संजय चोरडिया यांच्याकडे सोयाबीन विक्री केल्यानंतर पैसे मागण्यासाठी दुकानावर गेला. मात्र कशाचे पैसे असे उत्तर व्यापाऱ्याने दिले. तसेच ‘पैसे नाही’ असे म्हणत व्यापाऱ्याने पावती फेकून दिली. तसेच उद्धट भाषेचा वापर केला. असे व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

व्यापाऱ्याने मागितली माफी...

शेतकऱ्याशी मुजोरीने वागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बाजार समितीने व्यापाऱ्याचा परवाना तत्काळ रद्द केला आहे. यावर खरेदीदाराने सर्व शेतकरी बांधवांची माफी मागितली. यापुढे सौजन्याने वागण्याबाबत बाजार समितीतील व्यापारी व प्रशासनास सूचना देण्यात आल्या.

यापुढे व्यापाऱ्यांनी मुजोरीची भाषा वापरल्यास बाजार समिती त्यांच्यावर अशीच कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन समितीचे सभापती बाजार बाळासाहेब क्षीरसागर यांनी निफाड येथे झालेल्या बैठकीत दिले. उपसभापती गणेश डोमाडे, संचालक राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, शेतकरी व कर्मचारी या वेळी होते.

परवाना कायमस्वरूपी रद्द करा ः मनसे

सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करून नियम तोडणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी मनसेने लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. बुधवारी (ता. २५) मनसेच्या विद्यार्थी सेनेने चोरडिया यांच्या दुकानासमोर आंदोलन केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT