Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : हजारो शेतकऱ्यांचा हरभरा पडून

Chana Market Update : शासनाच्या पुढाकाराने १५ मार्चपासून जिल्ह्यात नाफेडने हरभरा खरेदी सुरू केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांत अनेक ठिकाणी ६० पेक्षा अधिक केंद्रे सुरू केली.

Team Agrowon

Buldhana : जिल्ह्यात हमीभाव खरेदीला (MSP Procurement) सुरुवात होऊन एक महिनाही पूर्ण झालेला नाही. तोच उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने पोर्टल बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा हरभरा सध्या पडून आहे. शिवाय खरेदी केलेल्या हजारो क्विंटल हरभऱ्याच्या नोंदीसुद्धा रखडल्याने खळबळ उडाली आहे.

शासनाच्या पुढाकाराने १५ मार्चपासून जिल्ह्यात नाफेडने हरभरा खरेदी सुरू केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांत अनेक ठिकाणी ६० पेक्षा अधिक केंद्रे सुरू केली.

महिन्याच्या आतच उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने रविवारी (ता. ९) अचानक खरेदी थांबवण्यात आली. केंद्रांवर मोजमाप झालेल्या वाहनांच्या नोंदी पोर्टलवर करण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न केले तर उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा संदेश दिसून येत होता.

राज्यात ८१ लाख क्विंटल खरेदीचा लक्ष्यांक आहे. त्यापैकी बुलडाणा जिल्ह्यात ६ लाख ५८ हजार क्विंटल खरेदी झाली आहे. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील हरभरा खरेदीच्या नोंदी थांबविल्या. पोर्टलवरून या जिल्ह्याच्या नव्याने नोंदी आता होणार नाहीत.

एकूण उत्पादकतेच्या २५ टक्के खरेदी -

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याला मिळालेले खरेदीचे उद्दिष्ट हे एकूण उत्पादित हरभऱ्याच्या २५ टक्के आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात याच निकषानुसार खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे.

खुल्या बाजारात हरभरा अवघा चार ते साडेचार हजारांदरम्यान विकत आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रांवर अवलंबून आहेत. नोंदणीकृत एकूण शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचाच हरभरा खरेदी होऊ शकलेला आहे.

अजूनही ५० ते ६० टक्के शेतकरी प्रतीक्षेत आहेत. खरेदीच थांबविल्याने राहिलेल्यांचे काय, असा प्रश्‍न आहे. हा निकष तातडीने बदलून खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

बुलडाणा जिल्ह्याचे हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आली. याबाबत सचिवांसोबत बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे.
- डॉ. ह. पि. तुम्मोड, जिल्हाधिकारी, बुलडाणा
सरकारने शेतकऱ्यांचा पूर्ण शेतीमालाच्या खरेदीची जबाबदारी घ्यायला हवी. अद्याप ७५ टक्के हरभरा पडून आहे. मधल्या काळात जिल्ह्यात पाच ते सहा दिवस पाऊस होता. त्यामुळे खरेदी बंद राहिली. आता खरेदीसाठीचे संदेश शेतकऱ्यांना पाठविल्याने ते केंद्रांवर पोहोचले. मात्र अचानक खरेदी बंद केली. शेतकऱ्यांच्या प्रत्येक दाण्याची खरेदी करा, अन्यथा आंदोलन करू.
- रविकांत तुपकर, शेतकरी नेते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT