Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : यंदाही साखरेच्या उत्पादनात घट

Sugar Market : यंदाचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असला, तरी हंगामावर निवडणुकीचे सावट असल्याने प्रत्यक्षात हंगाम नोव्हेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : यंदाचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असला, तरी हंगामावर निवडणुकीचे सावट असल्याने प्रत्यक्षात हंगाम नोव्हेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज सहकार विभागाने व्यक्त केला आहे.

मात्र दर वर्षी सहकार आणि कृषी विभाग व्यक्त करत असलेला अंदाज फोल ठरत असून प्रतिवर्षी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा जास्त गाळप आणि साखर उत्पादन होत असल्याने हंगामाचे नियोजन कोलमडत असल्याचे समोर येत आहे.

मागील वर्षी ८८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र प्रत्यक्षात ११० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा मात्र, कृषी विभाग आणि मिटकॉनच्या अंदाजानुसार हेच उत्पादन ९० ते १०२ लाख टन होण्याची शक्यता वर्तविली आहे. यंदा महापूर आणि अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या ऊस क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी २०७ साखर कारखान्यांनी गाळप परवाना घेतला होता. या कारखान्यांनी १०७३.०८ लाख टन उसाचे गाळप केले आहे. ११०१.७ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आली होती. यंदाच्या गळीत हंगामासाठी ११.६७ लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी येण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर मिटकॉनने हेच क्षेत्र १३.७२ लाख हेक्टर असल्याचे सांगितले आहे. कृषी विभाग आणि मिटकॉनने व्यक्त केलेल्या अंदाजात बरीच तफावत असल्याने कृषी विभागाच्या अंदाजावर शंका व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने प्रतिवर्षी सादर केलेले आकडे वस्तुस्थितिदर्शक नसल्याचेही समोर आले आहे.

यंदाच्या हंगामात राज्यात होणाऱ्या ऊस उत्पादनात कृषी विभाग आणि मिटकॉनच्या अंदाजात २३१ लाख टनांचा फरक आहे. कृषी विभागाने १००४, तर मिटकॉनने ११३५ लाख टनांचा अंदाज व्यक्त केला आहे.

गाळपास येणारा ऊस : ९०४ ते १०१३ लाख टन

सरासरी ११.३० टक्के साखर उताऱ्यानुसार साखर उत्पादन : १०२ ते ११४ लाख टन इथेनॉलसाठी वळविण्यात येणारी साखर : १२ लाख टन

निव्वळ साखर उत्पादन : ९० ते १०२ लाख टन

निव्वळ साखर उतारा : ९. ९५ ते १०.०६ टक्के

२०२४-२५ ची एफआरपी

१०.२५ टक्के उताऱ्यासाठी ३४०० रुपये

१०.२५ टक्क्यांच्या पुढील ०.१ टक्का उताऱ्यासाठी ३३.२० रुपये

१०.२५ पेक्षा कमी आणि ९.५० टक्क्यांपेक्षा जास्त उतारा असेल तर ०.१ टक्क्यासाठी ३३.२० प्रति टन

९.५ किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास प्रतिटन ३१५१ रुपये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT